Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Shortage of gas cylinders :वाडेगाव परिसरात गॅस सिलेंडरचा तुटवडा; महिलांची मोठी कुचंबना

Shortage of gas cylinders :वाडेगाव परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील महिलांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंडेन गॅसची गाडी गावोगावी पोहोचत नसल्याने सुमारे ४० ते ४५ गावांतील ग्राहक त्रस्त झाले आहेत.

Shortage of gas cylinders

दोन दिवसांपासून गॅस गाडीच गायब; ४०-४५ गावांतील ग्राहक त्रस्त

राहुल सोनोने  

वाडेगाव   : वाडेगाव परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील महिलांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंडेन गॅसची गाडी गावोगावी पोहोचत नसल्याने सुमारे ४० ते ४५ गावांतील ग्राहक त्रस्त झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगाव परिसरातील गावांमध्ये दररोज इंडेन गॅस सिलेंडरचे वितरण करणारी गाडी फिरत असते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोणत्याही गावात गॅसचा पुरवठा झालेला नाही. अनेक ग्राहकांनी कॉल करून चौकशी केली असता संबंधित कार्यालयाकडून “गॅसचा माल आलेला नाही” असे सांगण्यात येत असल्याची माहिती ग्राहकांनी दिली.

सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने महिलांची मोठी कोंडी झाली असून अनेक घरांमध्ये पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. शासनाने ऑनलाइन बुकिंगनंतर ११ दिवसांत सिलेंडर मिळेल, अशी माहिती दिली असली तरी प्रत्यक्षात वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांची गैरसोय वाढली आहे.

गॅसचा नियमित पुरवठा न झाल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील महिलांकडून होत आहे.

याबाबत माजी पंचायत समिती सदस्या रुपालीताई अनंता काळे यांनीही प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ग्राहकांना वेळेवर गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top