Mahabreaking

[breaking_news]

Shop burgled :पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील दुकान फोडले ; हजारो रुपयांच्या सिगारेट लंपास

Shop burgled :डोणगाव पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आणि राज्य महामार्गालगत असलेल्या एका किरकोळ दुकानात छताचे टिन कापून अज्ञात चोरट्याने प्रवेश करत हजारो रुपयांच्या सिगारेटची चोरी केल्याची धाडसी घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shop burgled

  डोणगावात चोरट्यांची धाडसी कारवाई; छताचे टिन कापून दुकानात प्रवेश, चोरटा CCTV मध्ये कैद

डोणगाव  : डोणगाव पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आणि राज्य महामार्गालगत असलेल्या एका किरकोळ दुकानात छताचे टिन कापून अज्ञात चोरट्याने प्रवेश करत हजारो रुपयांच्या सिगारेटची चोरी केल्याची धाडसी घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (४ ऑगस्ट) रोजी मध्यरात्री सुमारे ३ वाजेच्या सुमारास राज्य महामार्गावरील अनिल अढाव यांच्या दुकानाला अज्ञात चोरट्याने लक्ष्य केले. चोरट्याने दुकानाच्या छतावरील टिन पत्रे कापून आत प्रवेश केला. दुकानात प्रवेश केल्यानंतर इतर साहित्याला हात न लावता त्याने थेट हजारो रुपये किमतीच्या सिगारेटच्या पाकिटांवर डल्ला मारला आणि चोरीचा माल घेऊन पसार झाला.

बुधवार (५ ऑगस्ट) रोजी सकाळी दुकानदार नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता, छताचे टिन कापलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानातील मालाची उलथापालथ झालेली दिसून आली. तपासणी केल्यानंतर सिगारेटचे बॉक्स आणि पाकिटे चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

घटनेनंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, मध्यरात्री एक व्यक्ती छतावाटे दुकानात उतरून सिगारेटची पाकिटे व बॉक्स गोळा करताना आणि त्यानंतर चोरीचा माल घेऊन पळून जाताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे चोरट्याचा चेहरा आणि हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, या फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी सोपे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटना पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ घडल्याने व्यापाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, परिसरात रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला तातडीने अटक करून चोरीचा उलगडा करावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

दरम्यान, ही बातमी लिहीपर्यंत डोणगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून प्राथमिक माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top