Mahabreaking

[breaking_news]

  Shocking incident :बुलढाण्यात धक्कादायक घटना : टॉवरवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

Shocking incident : शहरातील शामनगर परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने विद्युत टॉवरवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १८ जुलै) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बुलडाणा शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. धीरज बबनराव सनगाळे असे मृतक युवकाचे नाव आहे.

Shocking incident

  शामनगर परिसर हादरला; युवकाचा घटनास्थळीच मृत्यू

बुलढाणा : शहरातील शामनगर परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने विद्युत टॉवरवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १८ जुलै) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बुलडाणा शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. धीरज बबनराव सनगाळे असे मृतक युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शामनगर येथील रहिवासी धीरज बबनराव सनगाळे   हा शनिवारी सकाळी सुमारे ५ वाजता घरातून बाहेर पडला होता. काही वेळाने परिसरातील १३२ केव्ही विद्युत वाहिनीच्या टॉवरखाली एक तरुण पडलेला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता तो धीरज सनगाळे असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. धीरज हा एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात धीरजने विद्युत टॉवरवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन वाघमोडे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top