Mahabreaking

[breaking_news]

Allegation of hurting :धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; मौलाना जर्जिस अन्सारी यांच्याविरोधात चौकशीची मागणी

Allegation of hurting : मौलाना जर्जिस अन्सारी यांनी कथितरित्या केलेल्या धार्मिक वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार, देऊळगाव राजा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनाही निवेदन देण्यात आले आहे.

Allegation of hurting

वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; कायदेशीर कारवाईची मागणी

 

गजानन तिडके

देऊळगाव राजा : मौलाना जर्जिस अन्सारी यांनी कथितरित्या केलेल्या धार्मिक वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार, देऊळगाव राजा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनाही निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनानुसार, मौलाना जर्जिस अन्सारी यांनी सुमारे महिनाभरापूर्वी एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणाचा व्हिडिओ १६ जुलै २०२६ रोजी सोशल मीडिया आणि यूट्यूबवर व्हायरल झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या भाषणात त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत विशिष्ट धार्मिक संदर्भातील विधान केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनात संबंधित वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा तसेच सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध लागू असलेल्या कायद्यांनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, भविष्यात कोणत्याही व्यक्तीकडून धार्मिक तेढ निर्माण करणारी किंवा सामाजिक शांततेला बाधा पोहोचविणारी वक्तव्ये होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर निवेदनात मौलाना जर्जिस अन्सारी (रा. इटावा, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, निवेदन १८ जुलै २०२६ रोजी तहसीलदार,तसेच स्थानिक विश्रामगृह येथे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांना निवेदन देण्यात आले. देऊळगाव राजा यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनावर शहरातील अनेक नागरिकांची स्वाक्षरी आहे.

nivedan

प्रतापराव जाधव यांनाही दिले निवेदन

ना. प्रतापराव गणपतराव जाधव, केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत नरसिंगराव खेडेकर यांच्या उपस्थितीत आज सिंदखेडराजा येथील जनता दरबारात श्रीकृष्ण गवळी समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी मौलाना जर्जिस अन्सारी यांनी कथितरीत्या हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याचा आरोप करत, संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top