Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Shaurya Diwas :वाडीआदमपूर येथे शौर्य दिन उत्साहात साजरा; विजय स्तंभाला मानवंदना, भव्य दुचाकी रॅलीने वेधले लक्ष

Shaurya Diwas : तेल्हारा तालुक्यातील वाडीआदमपूर येथे भीम शक्ती युवा मंडळाच्या वतीने कोरेगाव भीमा येथील २०८ व्या शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Shaurya Diwas

वाडीआदमपूर : तेल्हारा तालुक्यातील वाडीआदमपूर येथे भीम शक्ती युवा मंडळाच्या वतीने कोरेगाव भीमा येथील २०८ व्या शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी ९ वाजता युवकांनी हातात निळे झेंडे घेत, “जय भीम”च्या घोषणांसह गावातून भव्य दुचाकी रॅली काढली. या रॅलीने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. वाडीआदमपूरच्या मुख्य चौकात भीम शक्ती मंडळाच्या वतीने कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाची तब्बल २२ फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात आली होती. शौर्य दिनाच्या निमित्ताने वाडीआदमपूरसह परिसरातील हजारो अनुयायी सकाळपासून विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी तेल्हारा तालुक्यातील माजी सैनिक मेजर धनराज वानखडे, नाना धुंदळे, उमेश गायगोळ, स्वप्निल गायगोळ, रमेशसिंह पवार, ओमप्रकाश वानखडे, प्रल्हाद गुलाबराव, नितीन दामोदर, सुनील दातकर, नानाभाऊ इंगळे, मिलिंद बोदडे, जनार्दन दामोदर, सुरेश तेलगोटे, करण वानखडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महार रेजिमेंटच्या निवृत्त जवानांच्या वतीने विजय स्तंभास मानवंदना देण्यात आली.

सकाळी सुरू झालेल्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भीम अनुयायांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शौर्य दिनाच्या औचित्याने आयोजित उपक्रमांतून समता, स्वाभिमान व संघर्षाची प्रेरणा देण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, तेल्हारा तालुकाध्यक्ष, आघाडीचे पदाधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून विजय स्तंभाला अभिवादन केले.

मानवंदनेसाठी आलेल्या अनुयायांसाठी जाफरापूर येथील भीम मंडळाच्या वतीने खीरदान, तर इसापूर येथील भीम योद्धा मंडळाच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

संध्याकाळी आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध गायक संविधान मनोहरे यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. अनेक नव्या व जुन्या गीतांच्या सादरीकरणातून त्यांनी प्रबोधनासह उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यांच्या गाण्यांनी पंचक्रोशीतील भीम अनुयायांना थिरकायला भाग पाडले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम शक्ती युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी पंचक्रोशीतील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top