Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Ujjwal Public School :सावित्रीबाईंच्या विचारांनी उजळला उज्वल पब्लिक स्कूलचा परिसर; ज्ञानज्योतीस अभिवादन

Ujjwal Public School : समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि स्त्रीशक्तीच्या प्रतीक असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बोरगाव मंजू येथील उज्वल पब्लिक स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

Ujjwal Public School

बोरगाव मंजू : समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि स्त्रीशक्तीच्या प्रतीक असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बोरगाव मंजू येथील उज्वल पब्लिक स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला नरेंद्र सोनवणे होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून निता राजेंद्र बोबडे, स्मिता पाटील आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.

यावेळी मुबाशीर इलियास खान, कल्याणी इंदाने व धनश्री खोडके या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती प्रभावीपणे मांडत उपस्थितांची मने जिंकली. प्रसंगी शिक्षिका स्वाती जैन यांनी सावित्रीबाईंच्या जीवनपटावर सखोल प्रकाश टाकत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला.रुद्रायणी भराटे व आराध्या इंदाने यांनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत सादर केलेली झलक विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या सादरीकरणामुळे सावित्रीबाईंच्या कार्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली.

सदर कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका शारदा देशमुख व सौ. साक्षी इंगळे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मोहिनी इंगळे, मीना सराटे, प्रीती वाघमारे, जया हगवणे, दुर्गा असोलमोल, दिपाली देशमुख, पूजा तळोतकर, रूपाली कडू तसेच शिक्षक प्रशांत होणाले, प्रतीक वानखडे, रूपाली इंगळे, पूजा गावंडे यांनी मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमुद यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी माहुलकर यांनी मानले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करणारा ठरला. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top