Mahabreaking

[breaking_news]

Shatrughna Chavan: राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीजेएनटी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शत्रुघ्न चव्हाण यांची नियुक्ती

Shatrughna Chavan: लोणार तालुक्यातील हात्ता येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शाहीर शत्रुघ्न चव्हाण यांनी विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विविध प्रश्नांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाच्या व्हीजेएनटी सेलच्या बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Shatrughna Chavan

 शाहीर शत्रुघ्न चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सोपविली जिल्ह्याची जबाबदारी

रमेश खंडागळे

बिबी : लोणार तालुक्यातील हात्ता येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शाहीर शत्रुघ्न चव्हाण यांनी विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विविध प्रश्नांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाच्या व्हीजेएनटी सेलच्या बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दि. १० सप्टेंबर रोजी माननीय राजेंद्रजी शिंगणे साहेब, अभय भाऊ चव्हाण, नरेश शेळके यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाच्या व्हीजेएनटी सेलचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष श्री. गणपत भाऊ कुसळकर यांच्या हस्ते शत्रुघ्न चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सामाजिक प्रश्नांसाठी तसेच समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी शत्रुघ्न चव्हाण यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविल्याचे सांगण्यात आले.

या नियुक्तीबद्दल शत्रुघ्न चव्हाण यांचे विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून व्हीजेएनटी समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top