Mahabreaking

[breaking_news]

Messenger: अल्लाह आणि रसूल (सल्.) यांच्यावरील प्रेम जीवनात आचरणातून दिसावे

Messenger:  सध्याच्या बदलत्या सामाजिक व धार्मिक परिस्थितीत अल्लाह आणि पैगंबर हजरत मुहम्मद (सल्.) यांच्यावरील प्रेम अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी जुम्म्याच्या नमाजपूर्वी मौलाना इस्माईल इशाअती यांचे मार्गदर्शनपर विशेष बयान आयोजित करण्यात आले.

Messenger

 जुम्म्याच्या नमाजपूर्वी मौलाना इस्माईल इशाअती यांचे मार्गदर्शन; नेक अमल करण्याचे आवाहन

बाळापूर : सध्याच्या बदलत्या सामाजिक व धार्मिक परिस्थितीत अल्लाह आणि पैगंबर हजरत मुहम्मद (सल्.) यांच्यावरील प्रेम अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी जुम्म्याच्या नमाजपूर्वी मौलाना इस्माईल इशाअती यांचे मार्गदर्शनपर विशेष बयान आयोजित करण्यात आले.

‘अल्लाह आणि रसूल (सल्.) यांच्याशी प्रेम कसे निर्माण करावे?’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मौलाना इस्माईल इशाअती यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी अल्लाह व रसूल (सल्.) यांच्यावरील प्रेम दृढ करण्यासाठी तीन उत्तम कृतींचा उल्लेख करण्यात आला. त्यापैकी दोन महत्त्वपूर्ण अमल विशेषत्वाने स्पष्ट करण्यात आले.

आजच्या परिस्थितीत केवळ धार्मिक माहिती असणे पुरेसे नसून, मिळालेले धार्मिक ज्ञान आचरणात आणणे, दैनंदिन जीवनात नेक अमल वाढविणे आणि पैगंबर हजरत मुहम्मद (सल्.) यांच्या शिकवणीशी आपले जीवन जोडणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

श्रद्धा, सदाचार, संयम तसेच समाजातील परस्पर प्रेम, बंधुभाव आणि एकोपा अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनाचे आत्मपरीक्षण करावे, असे आवाहनही करण्यात आले.

अल्लाह व रसूल (सल्.) यांच्यावरील प्रेम हे केवळ शब्दांपुरते मर्यादित न राहता ते आपल्या आचार-विचार आणि दैनंदिन व्यवहारातून प्रतिबिंबित झाले पाहिजे, असा संवेदनशील व मार्गदर्शनपर संदेश या विशेष बयानातून देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top