Sharvari Tupkar :शिंदी येथील विद्युत वितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेले बद्री लक्ष्मण लंबे यांचा २६ मे रोजी महावितरणच्या लाईनचे काम करत असताना विद्युत प्रवाहाचा शॉक लागून अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ३० मे रोजी अॅड. शर्वरीताई तुपकर यांनी शिंदी येथे भेट देऊन लंबे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

वीज कामगाराच्या अपघाती मृत्यूनंतर तुपकर कुटुंबीयांकडे; महावितरणकडून मदतीची मागणी
साखरखेर्डा : शिंदी येथील विद्युत वितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेले बद्री लक्ष्मण लंबे यांचा २६ मे रोजी महावितरणच्या लाईनचे काम करत असताना विद्युत प्रवाहाचा शॉक लागून अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ३० मे रोजी अॅड. शर्वरीताई तुपकर यांनी शिंदी येथे भेट देऊन लंबे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
स्व. बद्री लंबे हे ३५ वर्षीय तरुण असून ते मेहनती व लाईनच्या कामात तरबेज असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरीताई तुपकर यांनी ३० मे रोजी बद्री लंबे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
यावेळी बोलताना त्यांनी या अपघाती मृत्यूप्रकरणी महावितरणने लंबे कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. तसेच महावितरणकडून आणखी कोणती मदत मिळू शकते, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. संपूर्ण लंबे कुटुंबाने धैर्याने परिस्थितीचा सामना करत एकमेकांना आधार द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अनंता दहातोंडे, गजानन खरात, देविदास सरकटे, सचिन खंडारे, राम अंभोरे, सखाराम गवई, संजाबराव हाडे, राजू लंबे, सौ. मनोरमाताई हाडे, शरद खरात आदी उपस्थित होते.

