Mahabreaking

[breaking_news]

Sandeep Shinde :रुईखेड मायंबा जि.प. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप शिंदे यांची पुनर्निवड

Sandeep Shinde : बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप राधाकिसन शिंदे यांची सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. पालक सभेत झालेल्या एकमुखी निर्णयामुळे गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sandeep Shinde

सलग दुसऱ्यांदा निवड; पालक सभेत एकमुखी निर्णय

बबन फेपाळे

रुईखेड मायंबा  : बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप राधाकिसन शिंदे यांची सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. पालक सभेत झालेल्या एकमुखी निर्णयामुळे गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गॅस टंचाईत बुलढाण्याला रॉकेलचा आधार; प्रत्येक कुटुंबाला ३ लिटर वाटप

शालेय व्यवस्थापन समितीचा मागील कार्यकाळ संपुष्टात आल्याने शनिवार, दि. २८ रोजी जिल्हा परिषद शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या आणि शांततेच्या वातावरणात पार पडली. मागील कार्यकाळात समितीने केलेल्या कामाचे उपस्थित पालकांनी कौतुक करत, संदीप राधाकिसन शिंदे यांनाच पुन्हा अध्यक्षपदी संधी द्यावी, अशी एकमुखी मागणी केली. त्यानुसार त्यांची सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. समितीच्या सदस्यपदी संतोष साबळे, साहेबराव वाघ, बाबुराव मगर, रजनीकांत मगर, संदीप उगले, राहुल रामेकर, गजानन उगले आणि विनोद सोनुने यांची निवड करण्यात आली.

या पालक सभेला मुख्याध्यापक राम औटी, ग्रामपंचायत सरपंच सुरेखा अनिल फेपाळे, उपसरपंच शिवाजी नप्ते, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीची रचना शांततेत आणि एकोप्याने पार पाडण्यासाठी गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top