Mahabreaking

[breaking_news]

Nilesh Sharma :जळगाव जामोदमध्ये भाजपची संघटनात्मक मोर्चेबांधणी; निलेश शर्मा बीएलए-१ प्रमुख

Nilesh Sharma : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. २७ जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रासाठी बीएलए-१ (विधानसभा प्रमुख) पदावर निलेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Nilesh Sharma

मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी भाजपचा मोठा निर्णय;  भाजप कार्यकर्त्यांत उत्साह

विवेक राऊत

संग्रामपूर  : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. २७ जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रासाठी बीएलए-१ (विधानसभा प्रमुख) पदावर निलेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २६ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्वाक्षरी असून, संबंधित जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शर्मा यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या नियुक्तीमुळे विधानसभा क्षेत्रातील मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवले जाणार असून, स्थानिक स्तरावर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यास मदत होणार आहे. तसेच बीएलए-२ पदांच्या नियुक्त्यांबाबत जिल्हाध्यक्ष, स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी गती मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. नियुक्तीनंतर निलेश शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top