Sai Ratha : श्री साई द्वारकामाई सेवा समिती, नागपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी उत्सवानिमित्त श्री साई दरबाराकडे पायी दिंडी काढण्यात येत आहे. या पायी यात्रेदरम्यान धोत्रा नंदई फाट्यावर साई रथाचे भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

गजानन भालेकर
धोत्रा नंदई : श्री साई द्वारकामाई सेवा समिती, नागपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी उत्सवानिमित्त श्री साई दरबाराकडे पायी दिंडी काढण्यात येत आहे. या पायी यात्रेदरम्यान धोत्रा नंदई फाट्यावर साई रथाचे भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
या वेळी भाविकांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था गजानन भालेकर यांनी केली. तसेच स्वागत कार्यक्रमाच्या आयोजनात गजानन शिंगणे (देऊळगाव मही) यांचेही सहकार्य लाभले.

या स्वागतप्रसंगी राजेश बगाडे, राजेंद्र लसणे, तुषार बोबडे, कुणाल बारंगे, पंढरी हरीश मस्के, प्रतीक सुरसुसे, नाद काळे, हर्षद जाचक, मयूर एकदखाने, अक्षित खेडेकर आदी भाविकांनी पायी दिंडीत सहभाग घेतला.
रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या या साई दिंडीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी साई नामाचा गजर करत रथाचे स्वागत करून यात्रेतील भाविकांचे स्वागत केले.