Mahabreaking

[breaking_news]

Lonar Lake :लोणार सरोवर विकासकामांना गती द्या! – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंगल यांचे निर्देश

Lonar Lake : जगप्रसिद्ध Lonar Lake परिसरातील विकासकामांना वेग देण्याच्या उद्देशाने अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त Dr. Shweta Singal यांनी लोणार येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

Lonar Lake

सरोवर परिसराची प्रत्यक्ष पाहणी; गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेत कामे पूर्ण करण्यावर भर

बुलढाणा : जगप्रसिद्ध Lonar Lake परिसरातील विकासकामांना वेग देण्याच्या उद्देशाने अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त Dr. Shweta Singal यांनी लोणार येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी जिल्हाधिकारी Dr. Kiran Patil यांच्या समवेत सरोवर परिसरातील सुरू असलेल्या बांधकामे, पायाभूत सुविधा व सौंदर्यीकरणाच्या कामांची सविस्तर माहिती घेतली. लोणार विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन वन विभाग, नगर परिषद आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रकल्पाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.

पाहणीदरम्यान आयुक्तांनी लोणारमधील प्रसिद्ध Sleeping Hanuman Temple येथेही दर्शन घेतले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन परिसरातील काही प्रलंबित प्रश्न मांडले.

यामध्ये गायमुख धार पुन्हा धार्मिक स्नानासाठी खुली करण्याची मागणी, सरोवरातील वाढत्या पाण्याच्या पातळीचा विचार करून गोड्या पाण्याचा नियंत्रित उपसा करण्याचा प्रस्ताव, लोणार परिसरातील प्राचीन मंदिरांना जोडून स्वतंत्र तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची मागणी, तसेच शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांबाबत तांत्रिक बाबींची तपासणी करून आवश्यक त्या स्तरावर कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात विभागीय वन अधिकारी (वन्यजीव, अकोला) यशवंत नागुलकर, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी, तहसीलदार भूषण पाटील, नगराध्यक्षा मीरा मापारी, मुख्याधिकारी बोबडे, तसेच पुरातत्त्व विभागाचे प्रतिनिधी व नगर परिषदेचे अभियंते उपस्थित होते.

लोणार सरोवराचा अद्वितीय नैसर्गिक वारसा जपत पर्यटन विकासाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने विशेष भर द्यावा, असेही निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top