Reservation lottery : सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांसाठी वार्डनिहाय आरक्षण सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली. सरपंच पदासाठी आरक्षण सोडत यापूर्वीच पार पडली असल्याने सदस्य पदांच्या आरक्षण प्रक्रियेकडे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सोडतीच्या वेळी नागरिकांची उपस्थिती अत्यल्प होती.
.
१७ सदस्यांच्या ग्रामपंचायतीसाठी वार्डनिहाय आरक्षण निश्चित; इच्छुकांच्या राजकीय हालचालींना वेग
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांसाठी वार्डनिहाय आरक्षण सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली. सरपंच पदासाठी आरक्षण सोडत यापूर्वीच पार पडली असल्याने सदस्य पदांच्या आरक्षण प्रक्रियेकडे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सोडतीच्या वेळी नागरिकांची उपस्थिती अत्यल्प होती.
ग्रामपंचायत ही गावच्या विकासाचा कणा मानली जाते. गावातील मूलभूत सुविधा, विकासकामे आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आढावा घेण्यासाठी नागरिकांचे लक्ष ग्रामपंचायतीच्या कार्यावर असते. निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी आपल्या वार्डात केलेल्या कामांचा हिशोब मतदार पुढील निवडणुकीत मागत असल्याने ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची मानली जाते.
साखरखेर्डा ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असून प्रत्येक वार्डात सुमारे १,८०० मतदार आहेत. त्यामुळे गावाच्या कारभाराची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची याबाबत मतदारांमध्ये विशेष उत्सुकता असते.
तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित दिवटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी. जी. मालोकार यांची आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी नियुक्ती केली होती. त्यांनी चक्राकार पद्धतीने वार्डनिहाय आरक्षणाचे जाहीर वाचन केले.
वार्डनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :
वार्ड क्रमांक १ : सर्वसाधारण , अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक २ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.), सर्वसाधारण,अनुसूचित जाती महिला
वार्ड क्रमांक ३ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.), सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक ४ : सर्वसाधारण , सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक ५ : सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ना.मा.प्र. महिला
वार्ड क्रमांक ६ : अनुसूचित जाती, सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला
आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास सरपंच ज्योती अमित जाधव उपस्थित होत्या. मात्र, मागील कार्यकाळातील इतर सदस्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. यावेळी दिलीप बेंडमाळी, चंद्रशेखर शुक्ल, संदीप खिल्लारे, बाबा तिवारी, शुभम राजपूत, अमित जाधव, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

