Mahabreaking

[breaking_news]

crop insurance:पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; १५ जूनला सिंदखेडराजात भव्य मोर्चा

crop insurance: सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील अनेक शेतकरी आजही त्यांच्या हक्काच्या पीक विमा रकमेपासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने पीक नुकसानीची दखल घेत नुकसान मान्य केले असतानाही अनेक शेतकऱ्यांना अद्याप विमा मिळालेला नसल्याने या प्रश्नावर आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती, सिंदखेडराजा येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

crop insurance

हक्काचा पीक विमा न मिळाल्यास मंत्रालयावर धडक; शेतकरी योद्धा कृती समितीचा इशारा

साखरखेर्डा : सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील अनेक शेतकरी आजही त्यांच्या हक्काच्या पीक विमा रकमेपासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने पीक नुकसानीची दखल घेत नुकसान मान्य केले असतानाही अनेक शेतकऱ्यांना अद्याप विमा मिळालेला नसल्याने या प्रश्नावर आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती, सिंदखेडराजा येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंदर्भात आयोजित बैठकीत प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः मोर्चात सहभागी होऊन आपल्या पीक विम्याच्या पावतीची झेरॉक्स प्रत तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रत्येक शेतकऱ्याकडून स्वतंत्र निवेदन प्रशासनाला सादर करण्यात येणार असून त्यासोबत पीक विम्याची पावती जोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्या थेट शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

मोर्चाचे नियोजन शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले असून हा लढा प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काचा असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मोर्चादरम्यान जमा होणाऱ्या प्रत्येक अर्जाचा पाठपुरावा करून संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

बैठकीत बोलताना शेतकरी नेत्यांनी शासन आणि विमा कंपन्यांवर नाराजी व्यक्त केली. पीक नुकसानीनंतरही विमा मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे यापुढे केवळ निवेदने देऊन थांबणार नसून गरज पडल्यास मंत्रालय, मुंबई येथे जाऊनही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

“आज जर आपण आपल्या हक्कासाठी उभे राहिलो नाही, तर उद्या आपल्या मुलांनी विचारले की, ‘बाबा, तुमच्या पीक विम्यासाठी शेतकरी लढत होते तेव्हा तुम्ही कुठे होता?’ याचे उत्तर आपल्याकडे असले पाहिजे,” असे भावनिक आवाहनही बैठकीत करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या मोर्चाची पूर्वकल्पना आणि माहिती उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा, तहसीलदार सिंदखेडराजा, तालुका कृषी अधिकारी तसेच पोलीस स्टेशन सिंदखेडराजा यांना देण्यात आली आहे. आता १५ जून रोजी होणाऱ्या या मोर्चाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून पीक विम्याच्या प्रश्नावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top