Mahabreaking

[breaking_news]

Rakhi tied: पातूर पोलिसांच्या मनगटावर राखी; ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ उपक्रम उत्साहात

Rakhi tied: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व स्नेह व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ हा सामाजिक उपक्रम दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी पातूर पोलीस ठाण्यात उत्साहात पार पडला.

Rakhi tied

  कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञतेचा धागा; पातूर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

राहुल सोनोने

दिग्रस बु. : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व स्नेह व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ हा सामाजिक उपक्रम दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी पातूर पोलीस ठाण्यात उत्साहात पार पडला.

द प्रोफेशनल करिअर बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था, पातूर आणि ग्रामीण युवा संघटना, तुलंगा बु. यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

पातूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, पीएसआय सुहास गोसावी, पीएसआय रमेश खंडारे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

पोलीस कर्मचारी वर्षभर नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असतात. विविध सण-उत्सवांच्या काळातही स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ते पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात मोर्णा महिला महाविद्यालय, पातूर तसेच ओयासिस सायन्स क्लासेस, पातूर यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थिनी व सहभागी सदस्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाबद्दल पोलीस बांधवांनीही आयोजक व सहभागी विद्यार्थिनींचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी द प्रोफेशनल करिअर अकॅडमी, पातूरचे संचालक अविनाश पोहरे आणि ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था, तुलंगा बु.चे संस्थापक सतीश हातोले यांनी पुढाकार घेतला. यावेळी ओयासिसचे संचालक जयेंद्र बोरकर, पवन तांबे, अॅड. पंकज पोहरे, सचिन तायडे, निशांत हातोले, शुभम गवई आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top