Mahabreaking

[breaking_news]

Punjab Vasaramol: ब्राम्हणचिकना शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पंजाब अवसरमोल

Punjab Vasaramol: जिल्हा परिषद शाळा, ब्राम्हणचिकना येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पंजाब अवसरमोल, तर उपाध्यक्षपदी देविदास शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Punjab Vasaramol

  उपाध्यक्षपदी देविदास शिंदे यांची निवड, नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचा सत्कार

रमेश खंडागळे

बिबी : जिल्हा परिषद शाळा, ब्राम्हणचिकना येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पंजाब अवसरमोल, तर उपाध्यक्षपदी देविदास शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी रुपाली टेकाळे, दिलीप अवसरमोल, हर्षा अवसरमोल, श्रीकिसन गायकवाड, अलिशा अवसरमोल व पूजा थुट्टे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा मुख्याध्यापक सर्जेराव नागरे व जाधव सर यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यात समन्वय असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम, उपलब्ध सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समितीने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संतोष अवसरमोल, सरपंच संदीप गायकवाड, विठ्ठल थुट्टे, पंढरीनाथ गायकवाड व भगवान गायकवाड यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top