Radheshyam Bangale : नशामुक्ती केंद्राचे संचालक राधेश्याम बंगाळे यांना व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल यावर्षीचा मानाचा ‘नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला. शिक्षक दिन आणि दैनिक समीकरणच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.

व्यसनमुक्तीच्या कार्याची दखल; राधेश्याम बंगाळेंचा ‘नॅशनल आयकॉन’ पुरस्काराने गौरव
साखरखेर्डा : नशामुक्ती केंद्राचे संचालक राधेश्याम बंगाळे यांना व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल यावर्षीचा मानाचा ‘नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला. शिक्षक दिन आणि दैनिक समीकरणच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती अशांतभाई वानखेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून हिंदी-मराठी पत्रकार संघ महाराष्ट्राच्या अध्यक्षा धनश्रीताई काटीकर पाटील, प्रा. अनिल खर्चे तसेच व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगतेही सादर केली.
अध्यक्षीय भाषणात अशांतभाई वानखेडे म्हणाले, “शिक्षक हे समाजाचा कणा असतात. ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊन सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य करतात.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणसिंग सिरसवाल यांनी केले. सूत्रसंचालन अनिल केसकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

