Mahabreaking

[breaking_news]

Tehsildar Vaishali Dongarjal :आवश्यक तेवढेच इंधन घ्या’; साठेबाजांवर कठोर कारवाईचा इशारा – तहसीलदार वैशाली डोंगरजाळ

Tehsildar Vaishali Dongarjal : देऊळगाव राजा तालुक्यात पेट्रोल व डिझेलचा सुरळीत पुरवठा कायम राहावा तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी तहसील प्रशासनाने विशेष पाहणी मोहीम हाती घेतली आहे. इंधन टंचाईच्या अफवा, संभाव्य साठेबाजी आणि वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.वाहन चालकांनी आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे असे आवाहन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे. तसेच साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tehsildar Vaishali Dongarjal

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – तहसील प्रशासनाचे आवाहन

गजानन तिडके

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यात पेट्रोल व डिझेलचा सुरळीत पुरवठा कायम राहावा तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी तहसील प्रशासनाने विशेष पाहणी मोहीम हाती घेतली आहे. इंधन टंचाईच्या अफवा, संभाव्य साठेबाजी आणि वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.वाहन चालकांनी आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे असे आवाहन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे. तसेच साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर दि. 23 रोजी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत इंधन वितरणाची स्थिती, उपलब्ध साठा, नागरिकांमध्ये पसरत असलेल्या अफवा तसेच कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल किंवा डिझेलचा अनावश्यक साठा करू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

तसेच कुठेही कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचे आढळल्यास किंवा नियमांचे उल्लंघन होत असल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती देण्याच्या सूचना पोलीस पाटलांना देण्यात आल्या. प्रशासनाच्या कामात सक्रिय सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले.यानंतर तहसीलदार वैशाली डोंगर-जाळ यांनी देऊळगाव राजा शहरातील पेट्रोल पंपांना प्रत्यक्ष भेट देत तपासणी केली. यावेळी इंधन साठा, विक्रीची स्थिती, वितरण प्रक्रिया तसेच संबंधित नोंदींची पाहणी करण्यात आली. प्रशासनाने तपासणी केली असता संबंधित पेट्रोल पंपांवर इंधन वितरण नियमित व सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, तहसील प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. “आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे, अनावश्यक साठेबाजी टाळावी. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा तहसीलदार वैशाली डोंगर-जाळ यांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top