Prawns : तालुक्यातील खडकपूर्णा जलाशय परिसरात मासेमारीच्या ठेक्यातून मोठ्या प्रमाणात झिंगे चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी दोघा नामनिर्देशित आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

१०० ते १२० किलो झिंगे लंपास; चोरीच्या घटनांमध्ये झाली वाढ
देऊळगाव राजा : तालुक्यातील खडकपूर्णा जलाशय परिसरात मासेमारीच्या ठेक्यातून मोठ्या प्रमाणात झिंगे चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी दोघा नामनिर्देशित आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी राजू हरीराम मौर्या (वय ३३, रा. खळयाळ गव्हाण, व्यवसाय – खडकपूर्णा धरण वॉचमन) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांनी खडकपूर्णा जलाशयातील मासेमारीचा ठेका घेतलेला असून जलाशय परिसरात देखरेखीचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास खडकपूर्णा जलाशयातील खल्याळ गव्हाण शिवार परिसरात आरोपी वैभव भगवान दंडीयार, बन्सी टुंडीयार (दोघे रा. कुंभारझरी) तसेच दोन अज्ञात इसम यांनी जलाशयातून अंदाजे १०० ते १२० किलो झिंगे चोरी केल्याचा आरोप आहे. चोरीस गेलेल्या झिंग्यांची किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिट पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

