Mahabreaking

[breaking_news]

Power cut :दहा-पंधरा मिनिटांत वीज गुल! काटेलसह चार गावांतील शेतकरी त्रस्त; वायरमन बदलण्याची मागणी

Power cut : संग्रामपूर तालुक्यातील काटेल, कोलद, वडगाव आणि वान परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. दर दहा ते पंधरा मिनिटांनी वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, त्यामुळे शेतीची कामे प्रभावित होत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे.

Power cut

 दुष्काळात वीजपुरवठ्याचा लपंडाव; शेतकऱ्यांचा महावितरणला आंदोलनाचा इशारा!

एकलारा-बानोदा : संग्रामपूर तालुक्यातील काटेल, कोलद, वडगाव आणि वान परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. दर दहा ते पंधरा मिनिटांनी वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, त्यामुळे शेतीची कामे प्रभावित होत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे.

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असताना संबंधित वायरमन यांच्याशी संपर्क साधूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी, गावातील सरपंच आणि नागरिकांनी संग्रामपूर येथील महावितरण कार्यालयात जाऊन लेखी निवेदन दिले. या निवेदनातून संबंधित वायरमन बदलण्यासह वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सध्या परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यांच्या अडचणींत आणखी भर पडत आहे. शेतीसाठी विजेची आवश्यकता असताना पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

महावितरणने या समस्येची त्वरित दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा आणि संबंधित वायरमन बदलण्याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काटेल, कोलद, वडगाव आणि वान येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

निवेदनावर सरपंच पंकज मिसाळ, सरपंच प्रवीण काळे, मनोहर कुकडे, सोपान कुकडे, सागर देऊळकर, मोहन गवांडे, सचिन कठाणे, महेश राऊत, गोपाल म्हसणे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  शेतकऱ्यांची मागणी तातडीने पूर्ण करा!

काटेल, कोलद, वडगाव आणि वान परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. वायरमनकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महावितरण कार्यालयात निवेदन देण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. महावितरणने तातडीने नियोजन करून वीजपुरवठा सुरळीत करावा आणि संबंधित वायरमन बदलावा.

— सोपान कुकडे, शेतकरी, काटेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top