Principal Dr. Santosh Dhage : संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील श्री खोटेश्वर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ. कलाम हे केवळ महान शास्त्रज्ञ नव्हते, तर विज्ञान क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांनी जपला पाहिजे, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष ढगे यांनी केले.

डॉ. कलाम यांचे विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी; एकलारा विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात
विवेक राऊत
संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील श्री खोटेश्वर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ. कलाम हे केवळ महान शास्त्रज्ञ नव्हते, तर विज्ञान क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांनी जपला पाहिजे, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष ढगे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संतोष ढगे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संतोष ढगे म्हणाले की, डॉ. कलाम यांनी अग्नी आणि पृथ्वी यांसारख्या क्षेपणास्त्रांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारताच्या सामरिक सामर्थ्यात भर घातली. त्यांचे जीवन, कार्य आणि विचार आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश आत्मसात करून विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहावे आणि पुस्तकांशी मैत्री करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यालयाच्या ग्रंथालयात डॉ. कलाम यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित ‘अग्निपंख’, ‘Wings of Fire’ यांसह विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातील पुस्तकांचे अवलोकन केले, तसेच पुस्तकांचे वाचन आणि परीक्षण करून वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एन. व्ही. सपकाळ सर यांनी केले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

