Mahabreaking

[breaking_news]

Sand Mafia :रेतीमाफीयांना पोलिसांचा दणका, दोन टिप्परसह ४०.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

Sand Mafia : रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतुक करीत असलेले दोन टिप्पर एसडीपीओंच्या पथकाने जप्त केले. या पथकाने  दोन टिप्परसह सुमारे ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच खाण आणि खनिज (नियमन व विकास) अधिनियम १९५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sand Mafia

नाकाबंदीदरम्यान एसडीपीओंच्या पथकाची कारवाई

 मेहकर : रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतुक करीत असलेले दोन टिप्पर एसडीपीओंच्या पथकाने जप्त केले. या पथकाने  दोन टिप्परसह सुमारे ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच खाण आणि खनिज (नियमन व विकास) अधिनियम १९५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. २८ मे २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान गुप्त बातमीदारामार्फत शेंदुर्जन ते मलकापूर पांग्रा मार्गावर अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शेंदुर्जन शिवारात नाकाबंदी करून उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने कारवाई केली.कारवाईदरम्यान एन.एल.-०१-एडी-४४३४ क्रमांकाचा सिग्मा कंपनीचा टिप्पर ताब्यात घेण्यात आला. या वाहनात सुमारे चार ब्रास गौण खनिज रेती आढळून आली. वाहनाची अंदाजे किंमत ३० लाख रुपये असून रेतीची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

तसेच एम.एच.-२८-बीबी-४०९९ क्रमांकाचा अशोक लेलँड टिप्परही पकडण्यात आला. या टिप्परमध्ये दोन ब्रास रेती आढळून आली असून वाहनाची किंमत अंदाजे १० लाख रुपये व रेतीची किंमत २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत एकूण सुमारे ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच खाण आणि खनिज (नियमन व विकास) अधिनियम १९५७ च्या कलम २१(१), २१(२) अन्वये साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी डिगांबर चव्हाण, सुनील देशमुख, उमेश घुगे, किशोर सांगळे, सुनील गाडे, कैलास गाडे, बद्री शिंदे, पंढरीनाथ जाधव व विलास जायभाये यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top