Mahabreaking

[breaking_news]

House Numbers on Tarpaulins :ताडपत्रीवर घर क्रमांक; बल्लाडीतील वास्तवाने विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

House Numbers on Tarpaulins : बाळापूर तालुक्यातील अतिदुर्गम बल्लाडी गावात मूलभूत सुविधांच्या अभावाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अनेक कुटुंबांकडे पक्की घरे नसल्याने तात्पुरत्या ताडपत्रीच्या आडोशात वास्तव्य करावे लागत असून, जनगणना प्रक्रियेदरम्यान अशाच ताडपत्रीवर घर क्रमांक टाकून नोंद करण्यात आल्याचे चित्र गावात पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावाच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

House Numbers on Tarpaulins

दरवाजा नाही, ताडपत्रीवरच जनगणना; अतिदुर्गम बल्लाडी गावातील विदारक चित्र

 राहुल सोनोने

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील अतिदुर्गम बल्लाडी गावात मूलभूत सुविधांच्या अभावाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अनेक कुटुंबांकडे पक्की घरे नसल्याने तात्पुरत्या ताडपत्रीच्या आडोशात वास्तव्य करावे लागत असून, जनगणना प्रक्रियेदरम्यान अशाच ताडपत्रीवर घर क्रमांक टाकून नोंद करण्यात आल्याचे चित्र गावात पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावाच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लाडी गावात अनेक कुटुंबांना अद्यापही मूलभूत सुविधा, रस्ते, शिक्षण, निवास व्यवस्था तसेच विविध शासकीय योजनांचा पुरेसा लाभ मिळालेला नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. काही कुटुंबांकडे राहण्यासाठी पक्के घर नसल्याने ताडपत्री लावून घराची व्यवस्था करण्यात आली आहे. जनगणना प्रक्रियेसाठी कर्मचारी गावात पोहोचल्यानंतर घर क्रमांक नोंदविताना दरवाजा अथवा भिंत नसल्यामुळे ताडपत्रीवरच क्रमांक लिहिण्यात आल्याचे दिसून आले.

या घटनेचा व्हिडिओ गावातील एका युवकाने चित्रित करून सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यानंतर गावातील वास्तव आणि विकासाच्या दाव्यांवर चर्चा सुरू झाली आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनंतरही गावात पायाभूत सुविधांचा अभाव कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ग्रामस्थांच्या मते, गावात रस्ते, शिक्षण, पिण्याचे पाणी, घरकुल योजना आणि इतर मूलभूत सुविधांची कमतरता असून अनेक कुटुंबे अद्यापही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत. शासनाने गावाच्या विकासासाठी तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top