Omprakash Jamnik : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस विभागात निष्कलंक, साहसी व धैर्यपूर्ण सेवा बजावल्याबद्दल पोलीस हवालदार ओमप्रकाश जामनिक यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त अकोला येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांना हे पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

नक्षलग्रस्त भागातील शौर्यपूर्ण सेवेची दखल; ओमप्रकाश जामनिक यांचा सन्मान
आगाखान पठाण
अकोला : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस विभागात निष्कलंक, साहसी व धैर्यपूर्ण सेवा बजावल्याबद्दल पोलीस हवालदार ओमप्रकाश जामनिक यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त अकोला येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांना हे पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महानगरपालिका आयुक्त श्रीमती चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या हस्ते पोलीस हवालदार ओमप्रकाश जामनिक यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.
ओमप्रकाश जामनिक यांनी यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात धाडसीपणे सेवा बजावली आहे. या काळात त्यांनी दाखविलेल्या कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि साहसी कामगिरीची दखल घेत त्यांना यापूर्वी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, विशेष व खडतर सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक तसेच पोलीस महासंचालक पदक अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
सध्या जामनिक हे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील नक्षलविरोधी शाखा तसेच दहशतवादविरोधी शाखेत कर्तव्य बजावत आहेत. पोलीस विभागातील त्यांच्या उल्लेखनीय, धाडसी आणि निष्कलंक सेवेमुळे त्यांना पुन्हा एकदा उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
जामनिक यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी, सहकारी तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

