Mahabreaking

[breaking_news]

Road blocked: अतिक्रमणामुळे बंद झालेला रस्ता अखेर खुला; प्रतिभाताईंच्या उपोषणाला यश

Road blocked: पातूर तालुक्यातील कार्ला येथील रहिवासी प्रतिभाताई बोदडे यांच्या घराकडे जाण्या-येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करून भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना घरात ये-जा करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी अखेर १४ ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.अखेर पातूर पंचायत समितीचे माजी उपसभापती इमरान खान मुमताज खान यांनी पुढाकार घेऊन महिलेचा रस्त्याचा प्रश्न सोडवला.

Road blocked

 मध्यस्थीला यश! भिंत हटविण्याचे लेखी आश्वासन; कार्ल्यातील रस्त्याचा प्रश्न मार्गी

निशांत गवई

पातूर : पातूर तालुक्यातील कार्ला येथील रहिवासी प्रतिभाताई बोदडे यांच्या घराकडे जाण्या-येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करून भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना घरात ये-जा करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी अखेर १४ ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.अखेर पातूर पंचायत समितीचे माजी उपसभापती इमरान खान मुमताज खान यांनी पुढाकार घेऊन महिलेचा रस्त्याचा प्रश्न सोडवला.

कार्ला ग्रामपंचायत हद्दीत वाहतुकीच्या रस्त्यांवर अतिक्रमण होण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणावरून वाद-विवाद आणि हाणामारीचे प्रकारही घडल्याचे दिसून येते. असाच प्रकार कार्ला येथे घडला.

प्रतिभाताई बोदडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेने अतिक्रमण करून भिंतीचे बांधकाम केले होते. त्यामुळे प्रतिभाताईंना स्वतःच्या घरात जाण्या-येण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. त्यांनी याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, अपेक्षित तोडगा निघत नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

दरम्यान, सदर महिलेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पातूर पंचायत समितीचे माजी उपसभापती इमरान खान मुमताज खान यांनी पुढाकार घेतला. त्यांनी प्रथम अतिक्रमण करणाऱ्या महिलेशी चर्चा करून प्रतिभाताईंच्या घराकडे जाणारा रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली. चर्चेनंतर संबंधित महिलेने बांधकाम केलेली भिंत हटवून रस्ता मोकळा करण्याचे मान्य केले तसेच त्याबाबत लिखित आश्वासन दिले.

यानंतर या निर्णयाची माहिती उपोषणकर्त्या प्रतिभाताई बोदडे यांना देण्यात आली. प्रश्न मार्गी लागल्याने माजी उपसभापती इमरान खान मुमताज खान आणि कार्ला ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या हस्ते प्रतिभाताईंना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडविण्यात आले.

यावेळी देवनाथ तेलगोटे, भीमराव तेलगोटे, इरफान खान, प्रवीण चव्हाण, मनसाराम बोदडे, बाळू चव्हाण, गजानन चव्हाण, अब्दुल जाकीर, अब्दुल गणी, सविता सोनवणे, भीमराव सोनवणे, जानोजी राठोड आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top