Pitambar Maharaj : शिर्ला येथील श्री संत पितांबर महाराज संस्थान, पितांबरवाडी येथे श्री पितांबर महाराज पुण्यतिथी महोत्सव आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला शुक्रवार, दि. २८ ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. दि. ३ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात दररोज काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, विविध गावांतील वारकरी, भजनी मंडळे, टाळकरी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे पितांबरवाडी परिसरात पुढील काही दिवस भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ-कीर्तन, दिंडी व महाप्रसादाचे आयोजन; पितांबरवाडीत भक्तिमय वातावरण
निशांत गवई
पातूर : शिर्ला येथील श्री संत पितांबर महाराज संस्थान, पितांबरवाडी येथे श्री पितांबर महाराज पुण्यतिथी महोत्सव आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला शुक्रवार, दि. २८ ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. दि. ३ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात दररोज काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, विविध गावांतील वारकरी, भजनी मंडळे, टाळकरी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे पितांबरवाडी परिसरात पुढील काही दिवस भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत श्रींचा अभिषेक, वीणापूजन आणि कलशस्थापना करून सप्ताहाला सुरुवात झाली आहे. सप्ताहाच्या कालावधीत पहाटे ५ ते ६ या वेळेत काकडा, सकाळी ९ ते ११ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, तर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत हरिपाठ होणार आहे. रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत विविध कीर्तनकारांच्या उपस्थितीत हरिकीर्तनाचा कार्यक्रम होत आहेत.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. श्री देविदास महाराज अंधारे (शिर्ला) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. कु. खुशीताई भवाने (पातूर), रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी ह.भ.प. श्री रमेश महाराज लाहोळे (अंबाशी), तर सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी ह.भ.प. श्री संजय महाराज पाटील, अध्यक्ष गुरुदेव सेवाश्रम, पातूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच पुढील दिवसांत ह.भ.प. श्री हरिदास महाराज बावस्कार (कंचनपूर, खामगाव) आणि ह.भ.प. श्री यशवंत महाराज धोत्रे (विवरा) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात गायनाचार्य म्हणून ह.भ.प. श्री संजय महाराज राऊत, ह.भ.प. श्री देविदास महाराज अंधारे, ह.भ.प. श्री राजू महाराज कोकाटे, ह.भ.प. श्री गजानन वजाळे, ह.भ.प. श्री योगेश महाराज नाभरे, ह.भ.प. श्री रामेश्वर माहोकार, ह.भ.प. श्री गजानन बराटे आदी सहभागी होणार आहेत.
महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात म्हैसपूर येथील काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून, त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता विविध दिंड्यांच्या सहभागाने पातूर शहरातून श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात विविध गावांतील वारकरी व भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे.
मृदंगाचार्य म्हणून ह.भ.प. श्री रमेश लाहोळे, राहुल नाकट, दास गोविंद देशमुख महाराज, ह.भ.प. श्री मंगेश भुतकर, ह.भ.प. श्री महादेव भालतिलक आणि ह.भ.प. श्री मोहन महाराज मते यांच्यासह विविध कलाकारांचे सहकार्य लाभणार आहे. विणेकरी म्हणून ह.भ.प. श्री गजानन टोळे, पुंडलिक लांडे, ईश्वर महाराज बाभूळगाव, हिम्मतराव भगत आणि विजय खडसे यांची उपस्थिती राहणार आहे.
शिर्ला, बाभूळगाव, देऊळगाव, कापशी, चिंचोली, चरणगाव, विवरा, खानापूर, बाघजाळी, खामखेड, नांदखेड, गोटखेड, पास्टूल, अकोला, भंडाराज, तांदळी, राजनखेड, पार्टी, कवळेश्वर तसेच पातूर येथील विविध भजनी मंडळे आणि श्री सिदाजी महाराज सांप्रदायिक महिला व पुरुष भजन मंडळांचा टाळकरी म्हणून सहभाग राहणार आहे.
संपूर्ण महोत्सवासाठी मंडप व ध्वनिव्यवस्थेची जबाबदारी श्री पितांबर महाराज साऊंड सिस्टम, बाभूळगाव आणि पूजा साऊंड सिस्टीम, देऊळगाव यांच्याकडे राहणार आहे. तसेच जय बजरंग लाईटिंग डेकोरेशन, पातूर यांच्याकडून विद्युत रोषणाई व सजावटीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
श्री पितांबर महाराज संस्थान पितांबरवाडी, शिर्ला (पातूर), उत्सव समिती, भक्त मंडळ आणि गावकरी मंडळी यांच्या संयुक्त सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन, दिंडी, पालखी सोहळा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

