Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Petrol Shortage :बीबीमध्ये पेट्रोल टंचाईचा फटका; तीनपैकी दोन पंप बंद, वाहनधारक संतप्त

Petrol Shortage :जालना–मेहकर महामार्गावरील बीबी येथील पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून वाहनधारकांची अक्षरशः परवड होत आहे. गावात विविध कंपन्यांचे तीन पेट्रोल पंप असतानाही तिन्ही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Petrol Shortage

सुविधांचाही बोजवारा; बीबीतील पंपांवर वाहनधारकांचा संताप उसळला

रमेश खंडागळे

बीबी : जालना–मेहकर महामार्गावरील बीबी येथील पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून वाहनधारकांची अक्षरशः परवड होत आहे. गावात विविध कंपन्यांचे तीन पेट्रोल पंप असतानाही तिन्ही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बीबी येथील इंडियन ऑइल व नायरा कंपनीचे दोन पेट्रोल पंप मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण भार भारत कंपनीच्या गुलाब पेट्रोल पंपावर पडला होता. मात्र, या पंपावरही १७ मार्चच्या दुपारपासून ‘पेट्रोल नाही’ असा फलक लावण्यात आल्याने वाहनधारकांची अडचण अधिकच वाढली आहे. पेट्रोल पंपाच्या मालकाशी संपर्क साधला असता, कंपनीकडूनच पेट्रोलचा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, इंधनाच्या टंचाईसोबतच पेट्रोल पंपांवरील मूलभूत सुविधांचाही पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. पंपावरील लघुशंकागृहाची साफसफाई होत नसल्याने ती अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असल्याचे दिसून आले. याबाबत व्यवस्थापकांना विचारणा केली असता स्वच्छतेसाठी कर्मचारी मिळत नसल्याचे कारण पुढे करण्यात आले.

तसेच वाहनांमध्ये हवा भरण्यासाठी असलेली उपकरणेही नावालाच असून ती नादुरुस्त अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकंदरीत पेट्रोलचा तुटवडा आणि सुविधांचा अभाव यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाहनधारकांनी संबंधित कंपन्या व प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. बंद असलेले दोन्ही पेट्रोल पंप त्वरित सुरू करावेत आणि इंधनाचा नियमित पुरवठा करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top