Mahabreaking

[breaking_news]

Markets Ready :रमजानसाठी बाजारपेठ सज्ज! ईदसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीत नागरिकांचा उत्साह

Markets Ready : पवित्र रमजान महिन्याचे अखेरचे दिवस जवळ येत असताना बाळापूर शहरातील बाजारपेठांमध्ये सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण ईदसाठी लागणारे कपडे, शिरखुर्म्याचे साहित्य तसेच इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाजारात दाखल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठा उजळून निघाल्या असून व्यापाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Markets Ready

ज़ाकिर अहमद

बाळापूर : पवित्र रमजान महिन्याचे अखेरचे दिवस जवळ येत असताना बाळापूर शहरातील बाजारपेठांमध्ये सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण ईदसाठी लागणारे कपडे, शिरखुर्म्याचे साहित्य तसेच इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाजारात दाखल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठा उजळून निघाल्या असून व्यापाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुस्लिम धर्मामध्ये रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे उठून तहज्जुदची नमाज अदा करतात. सहरीनंतर रोजा (उपवास) सुरू करून दिवसभर संयम व इबादतीत वेळ घालवतात. दिवसातील फजर, जोहर, असर, मगरिब व इशा या पाच वेळच्या नमाजांसह रात्री तरावीहची नमाजही अदा केली जाते. त्यामुळे संपूर्ण महिनाभर शहरात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण झालेले असते.

Markets Ready

रमजान महिन्यातील शेवटचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. विशेषतः शबे-कद्र ही रात्र मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. सध्या रमजानचे अवघे काही दिवस उरले असल्याने ईदच्या तयारीला वेग आला आहे. नागरिकांकडून कपडे, सुगंधी अत्तर, टोपी, चप्पल तसेच शिरखुर्म्यासाठी लागणारे शेवया, खजूर, सुका मेवा, दूध व साखर यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे.

दरम्यान, बाळापूर शहरातील मुख्य बाजारपेठा, कपड्यांची दुकाने तसेच किराणा दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली असून रात्री उशिरापर्यंत खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे. ईदच्या स्वागतासाठी शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले असून रमजानच्या शेवटच्या दिवसांत धार्मिकतेसोबत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top