Mahabreaking

[breaking_news]

health check-ups: लाखनवाड्यात आयुष शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५४८ नागरिकांची आरोग्य तपासणी

health check-ups: राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय, लाखनवाडा (ता. खामगाव) येथे ९ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य मोफत आयुष रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ५४८ नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आयुष उपचार व औषधोपचाराचा लाभ देण्यात आला.

health check-ups

 आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचारांचा एकाच छताखाली लाभ; लाखनवाड्यात भव्य आयुष शिबिर

खामगाव : राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय, लाखनवाडा (ता. खामगाव) येथे ९ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य मोफत आयुष रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ५४८ नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आयुष उपचार व औषधोपचाराचा लाभ देण्यात आला.

मा. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय आयुष अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी तसेच योग व निसर्गोपचार या विविध आयुष पद्धतींच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी, रोगनिदान, उपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरासाठी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सचिन चव्हाण (एम.डी.), डॉ. गणेश हरणे (एम.डी.), युनानी तज्ज्ञ डॉ. मोईन खान आणि होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. स्वाती धारस्कर यांनी विशेष उपस्थिती देत रुग्णांची तपासणी व उपचार केले.

विविध आजारांवर तपासणी व मार्गदर्शन

शिबिरामध्ये आयुर्वेद पद्धतीने रोगनिदान व उपचार, युनानी पद्धतीने तपासणी व उपचार, होमिओपॅथी उपचार व मार्गदर्शन तसेच योग व निसर्गोपचाराबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. विविध आजारांबाबत आरोग्यविषयक समुपदेशनही करण्यात आले. आवश्यकतेनुसार काही रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

हे शिबिर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

यावेळी जिल्हा आयुष सल्लागार डॉ. मोहम्मद शफाअत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) डॉ. जुनेद इब्राहिम, सौरभ कुळकर्णी आणि रामेश्वर भोलाने यांची पूर्णवेळ उपस्थिती होती.

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना जिल्हा आयुष अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी राष्ट्रीय आयुष अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आयुष आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे आणि नागरिकांमध्ये निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करणे हा शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले.

ग्रामीण रुग्णालय लाखनवाडा येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजू राठोड, आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती लड्डा, युनानी वैद्यकीय अधिकारी डॉ. गुफ्रान उल्ला खान तसेच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.

मोफत तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि औषधोपचार उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांनी शिबिराचे स्वागत केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top