the lawyers’ association : नाशिक येथील पालक मंत्री गिरीश गाजी महाजन यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात झेंडावंदन करताना भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव हेतुपुरस्सरपणे आपल्या भाषणात न घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या निषेधार्थ मेहकर पोलीस ठाण्यात जाहीर निषेध नोंदवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली आहे.

पालक मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध; पोलिस ठाण्यात तक्रार देवून कायदेशीर कारवाईची मागणी
मेहकर :नाशिक येथील पालक मंत्री गिरीश गाजी महाजन यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात झेंडावंदन करताना भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव हेतुपुरस्सरपणे आपल्या भाषणात न घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या निषेधार्थ मेहकर पोलीस ठाण्यात जाहीर निषेध नोंदवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली आहे.
दिनांक २६ जानेवारी रोजी नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात पालक मंत्री या नात्याने गिरीश महाजन यांनी झेंडावंदन केले. मात्र, भाषणादरम्यान त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, वनविभागाच्या अधिकारी माधुरी जाधव यांनी सदर बाब त्यांच्याच लक्षात आणून दिल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान अंमलात आले. विविध जाती, धर्म, पंथ व विचारसरणी असतानाही देश एकसंध ठेवण्याचे श्रेय संविधानाला असून, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यामुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन त्यांच्या योगदानाचा गौरव करणे ही केवळ परंपरा नव्हे, तर राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
असे असताना, जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळणे हा संविधानाचा व महामानवांचा अपमान असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. या प्रकाराविरोधात तीव्र भावना व्यक्त करत, संबंधित पालक मंत्र्यांचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला असून, तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी मेहकर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनावर अॅ ड. अनंतराव वानखेडे, अॅाड. विष्णू सरदार, अॅरड. एस. भालेराव यांच्यासह अॅ ड. गजानन लांडगे, अॅवड. बबनराव वानखेडे, अॅेड. संजय कुमार नवघरे, अॅाड. जे. डी. गवई, अॅ ड. समाधान कटारे, अॅ ड. अंजली जाधव, अॅ ड. इशिता डोंगरदिवे यांच्यासह अनेक वकिलांच्या सह्या आहेत. या प्रकरणामुळे सामाजिक व राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पोलीस प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

