Mahabreaking

[breaking_news]

Rajashree Waghmare.: ‘शिक्षणाची ज्ञानगंगा’च विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर नेईल; राजश्री वाघमारे

Rajashree Waghmare.:  येथील संत ज्ञानेश्वर अंध, अपंग व मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपत जागतिक आरोग्य सल्लागार राजश्री वाघमारे यांच्या पुढाकारातून आवश्यक शालेय साहित्य व नाश्त्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

Rajashree

अंध-दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा; शालेय साहित्य व नाश्त्याचे वाटप

देऊळगाव मही : येथील संत ज्ञानेश्वर अंध, अपंग व मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपत जागतिक आरोग्य सल्लागार राजश्री वाघमारे यांच्या पुढाकारातून आवश्यक शालेय साहित्य व नाश्त्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना राजश्री वाघमारे म्हणाल्या, “अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. शिक्षणाची ज्ञानगंगा हीच या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाईल.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद स्वामी शिक्षण संस्थेच्या संचालिका सोनल आरमाळ होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींच्या काळात सदैव उभे राहून सामाजिक दायित्व जपण्याचे आवाहन केले.

यावेळी जागतिक आरोग्य सल्लागार गोपाल वाघमारे, वरिष्ठ आरोग्य सल्लागार डॉ. कैलास भोलाने, योगिता भोलाने, साजिद शेख, अमोल बोबडे, अयोध्या देशमुख, माणिकराव शिंदे, संजय अंजनकर, सी.एच.ओ. गजानन शिंगणे, शिल्पा बंगाळे, भगवान शिंदे, दांडगे, पुंजाजी गवई, विष्णू भुतेकर, अमोल शिंगणे, पूनमचंद मरमट, सुमित गवई, सचिन देशमुख, अरुणा गवई, अर्चना शिंगणे, अश्विनी शिंगणे, संगीता चेके, वैशाली बोबडे, वैशाली शिंगणे, स्वाती भुतेकर, गणेश खिल्लारे, वसतिगृह अधीक्षक पडघाण यांच्यासह असंख्य आरोग्य सल्लागार व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड सर यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top