Distribution: ‘तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे…’ या भावनेतून पांढरी बोंदरखेड येथे आरोळी सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून ‘रविवारची शाळा’ हा अनोखा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष असून, संचालक अमर दादा हे ही शाळा यशस्वीपणे चालवत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी सकाळी ‘गरजू व्यक्तींना रक्तदान अन्नदान वाटप ग्रुप’च्या पुढाकाराने शाळेतील गरजू मुला-मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; ‘रक्तदान-अन्नदान ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम
अकोला : ‘तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे…’ या भावनेतून पांढरी बोंदरखेड येथे आरोळी सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून ‘रविवारची शाळा’ हा अनोखा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष असून, संचालक अमर दादा हे ही शाळा यशस्वीपणे चालवत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी सकाळी ‘गरजू व्यक्तींना रक्तदान अन्नदान वाटप ग्रुप’च्या पुढाकाराने शाळेतील गरजू मुला-मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
समाजातील संवेदनशील आणि सामाजिक दायित्व जपणाऱ्या घटकांच्या सहकार्याने दरवर्षी या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत केली जाते. यंदाही शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
या कार्यक्रमाला बाळ काळणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सुजित वाकोडे, अंकुश चौधरी, अमित गावंडे, प्रवीण सातव, वैभव वाकोडे, शैलेश देशमुख, साहिल मोडक, राम पिसे, अश्विन वानखडे, निलेश खडसान, रोहन महेशकर, राजेश पांडे, लक्ष्मी अंभोरे, मालुबाई रामचौरे, अर्चना कांबळे, गोविंदा अवचार, अर्जुन चव्हाण, धम्मपाल नरवाडे, सोपान रामचौरे व गोपाल अवचार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आरोळी टीमच्या वतीने रोहन महेशकर यांनी ‘गरजू व्यक्तींना रक्तदान अन्नदान वाटप ग्रुप’चे मनःपूर्वक आभार मानले.

