truck looted: समृद्धी महामार्गावर चालकाला मारहाण करून कांद्याने भरलेला ट्रक जबरदस्तीने पळवून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मेहकर ते मालेगावदरम्यान भारत पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. या घटनेत ट्रक आणि त्यातील कांदा असा एकूण ३६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून, या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चालकाला मारहाण करून कांद्याचा ट्रक पळवला; चार अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल
डोणगाव : समृद्धी महामार्गावर चालकाला मारहाण करून कांद्याने भरलेला ट्रक जबरदस्तीने पळवून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मेहकर ते मालेगावदरम्यान भारत पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. या घटनेत ट्रक आणि त्यातील कांदा असा एकूण ३६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून, या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिराज अहमद पिता ऐजाज अहमद (वय २८, रा. थोन, ता. सिराथू, जि. कौशंबी, उत्तर प्रदेश) हे रायपूर, छत्तीसगड येथील जितेंद्र सहगल रोडलाईन यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक CG-04-PP-9113 चालवतात. २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता मिराज अहमद व त्यांचे काका मोहम्मद टकी हे ट्रकमध्ये सुमारे ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा ३० टन ५६० किलो कांदा भरून समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जात होते.
दरम्यान, मेहकर ते मालेगावदरम्यान चॅनेल क्रमांक २६० ते २६९ च्या दरम्यान पांढऱ्या रंगाच्या MH-15-HU-9004 क्रमांकाच्या कारमधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी ट्रक बळजबरीने थांबविला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी मिराज अहमद यांना मारहाण केली आणि २५ लाख रुपये किमतीचा ट्रक व ११ लाख ५० हजार रुपयांचा कांदा, असा एकूण ३६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन पसार झाले. पळून गेलेल्या आरोपींपैकी काही जण मराठी भाषेत बोलत असल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
घटनेनंतर मिराज अहमद यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कायमी अप क्रमांक ३१७/२०२६, कलम ३०९(६), १२६ भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठाणेदारांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार कैलास गावडे यांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले करीत आहेत.
समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्याचे आव्हान डोणगाव पोलिसांसमोर आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

