Mahabreaking

[breaking_news]

traffic rules :रस्त्यावर एक चूक, आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते” — वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन

traffic rules : रस्त्यावर वाहन चालवताना केलेली एखादी छोटीशी चूक गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकते आणि काही वेळा कायमचे अपंगत्वही येऊ शकते. त्यामुळे वाहन चालवताना प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी केले.

traffic rules

देऊळगाव राजा येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोटरसायकल रॅली

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : रस्त्यावर वाहन चालवताना केलेली एखादी छोटीशी चूक गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकते आणि काही वेळा कायमचे अपंगत्वही येऊ शकते. त्यामुळे वाहन चालवताना प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी केले.

शासनाच्या निर्देशानुसार १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत देऊळगाव राजा येथे मोटरसायकल रॅली व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली.

या वेळी चौकाचौकांतून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी वाहनधारकांना मार्गदर्शन केले. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. वैध वाहनचालक परवाना नसताना वाहन चालवू नये. १८ वर्षांखालील मुलांना पालकांनी वाहन चालविण्यास देऊ नये. वाहनाची सर्व अद्ययावत कागदपत्रे सोबत ठेवावीत. रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवावे. शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणांजवळून जाताना विशेष काळजी घ्यावी. प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनाची पीयूसी तपासणी वेळेत करावी. दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करू नये, अशा विविध नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या रॅलीमध्ये पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, अंढेरा सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, संजय मातोंडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक किनगाव राजा, राजकुमार कांबळे पोलीस उपनिरीक्षक, क्रांती ढाकणे पोलीस उपनिरीक्षक, सुरेश जारवाल पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष वाघ, सय्यद मुसा, वाहतूक पोलीस गणेश जायभाये,बद्रीनाथ डिगोळे, समाधान बंगाळे, समाधान गीते, शितल नांदे, मीना भिलावेकर, भगवान नागरे, रामेश्वर गीते, संजय गोरे, नारायण गिते, शिवदास गीते, विनोद गवई, अभिजीत ठाकरे, संजय काकड, दीपक जायभाये यांच्यासह विभागातील अंढेरा पोलीस स्टेशन,सिंदखेडराजा पोलीस स्टेशन ,किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग घेतला.अंढेरा, सिंदखेड राजा व किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत अधिकारी व अंमलदारांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला.रस्ता सुरक्षा अभियानामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती वाढण्यास मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top