Mahabreaking

[breaking_news]

Uddhav Sena :आक्षेपार्ह वक्तव्य समाज माध्यमावर केले व्हायरल, उध्दवसेनेचे एसडीपीओंना निवेदन

Uddhav Sena : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून सामाजिक व राजकीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आज, दि. २८ मार्च रोजी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर व ठाणेदार, मेहकर यांना देण्यात आले.

Uddhav Sena

 दोषींवर कारवाई करण्याची मागणी, व्हायरल व्हिडीओमध्ये आमदार खरातांना जीवे मारण्याची धमकी

मेहकर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून सामाजिक व राजकीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आज, दि. २८ मार्च रोजी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर व ठाणेदार, मेहकर यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दि. २२ मार्च २०२६ रोजी दुपारनंतर प्रसारमाध्यमांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी निंदाजनक वक्तव्य करण्यात आले तसेच आमदार सिद्धार्थ खरात यांना मारण्याची धमकी देण्यात आली. संबंधित व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला. यात दादागिरीची भाषा वापरत आमदार सिद्धार्थ खरात यांना घरातून ओढून मारण्याची धमकी देण्यात आली असून, “आमच्यावर वीस-पंचवीस गुन्हे आहेत, आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही,” अशी आक्षेपार्ह भाषा संदीप तट्टे याने वापरल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण होऊन सामाजिक व राजकीय तेढ वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देताना उपजिल्हाप्रमुख आशिष  रहाटे, तालुकाप्रमुख निंबाभाऊ पांडव, शहरप्रमुख तथा नगराध्यक्ष किशोर  गारोळे, युवा शहरप्रमुख आकाश  घोडे, तालुका समन्वयक संजय वडकर, नगरसेवक महेश रिंढे, नितीन तुपे, निसार अन्सारी, अॅड. संदीप गवई, डॉ. शेषराव बदर, साहेबराव हिवाळे, दत्तात्रय घनवट, परमेश्वर दहातोंडे, पंडित बापू देशमुख, अमोल बोरे, राजेक अली, सनी सांगळे, गोपाल गायकवाड, अमोल मोरे, विकास शिंदे, शुभम पानखेडे, विलास शिंदे, गणेश गावंडे, संतोष लाड, पवन टाले, गबाजी गवई, छट्टू गवळी, गजानन जाधव, राजू दांदडे, छगन सांगोळे, समाधान सरदार, महिला आघाडी प्रमुख स्वाती नवले आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top