Objectionable Facebook post: माळी समाजाविषयी वादग्रस्त पाेस्ट करणाऱ्या देऊळगाव कोळ येथील आरोपी दत्तात्रय कायंदे याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पाेलिसांनी ३० ऑक्टाेबर राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दत्तात्राय कायंदेविरुद्ध कठाेर कारवाई करण्याची मागणी माळी समाज बांधवांनी केली आहे.

देऊळगाव राजा : माळी समाजाविषयी वादग्रस्त पाेस्ट करणाऱ्या देऊळगाव कोळ येथील आरोपी दत्तात्रय कायंदे याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पाेलिसांनी ३० ऑक्टाेबर राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दत्तात्राय कायंदेविरुद्ध कठाेर कारवाई करण्याची मागणी माळी समाज बांधवांनी केली आहे.
देऊळगाव कोळ येथील आरोपी दत्तात्रय कायंदे याने २९ ऑक्टाेबरला पावणे चार वाजता फेसबुकवर माळी समाजातील महिलांबद्दल आक्षेपाहार्य पोस्ट केली होती. या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्र सह समाजात तीव्र संतापाचे लाट उसळलेली आहे. याचा तीव्र निषेध ठिकठिकाणी होत आहे. अशा मनोविकृती असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी देऊळगाव राजा येथे संपूर्ण माळी समाज एकवटला होता. त्यांना इतर समाजांनी सुद्धा पाठिंबा दिला.
आरोपी विरुद्ध देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यात आला असून फिर्यादी मंगेश तिडके यांच्या तक्रारीवरून सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी प्रामुख्याने सतीश कायंदे, दीपक बोरकर, मंगेश तिडके, संजय तिडके,गजानन वाघमारे, रोहिदास बोराटे,गणेश डोके, पूजा खांडेभराड,मनोज खांडेभराड,राजेस तायडे,बाळू शिंगणे, तेजस मुंडे, ओम खांडेभराड,सदाशिव मुंडे, प्रदीप हिवाळे, गजानन टकले,अरविंद खांडेभराड, सचिन आंधळे, विजय वाघ,किशोर खांडेभराड, प्रवीण झोरे, योगेश राऊत, जालिंदर मेहत्रे, प्रकाश खांडेभराड,गिरीश वाघमारे, कृष्णा वाघ, भगवान खांडेभराड, विवेक नागरे, हरिभाऊ वाघ, संतोष खरात, राम बोराटे, योगेश खांडेभराड,सचिन वाघ यांच्यासह शेकडो समाज तसेच इतर उपस्थित होते सदर आरोपीविरुद्ध फिर्यादी मंगेश तिडके यांच्या यांच्या तक्रारीनुसार सदर आरोपी विरुद्ध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी करीत आहेत.

