Mahabreaking

[breaking_news]

MPSC examinations:  एमपीएससीच्या नऊ परीक्षांची चौकशी होणार! प्रश्नपत्रिका फुटीच्या कथित प्रकरणांनी खळबळ

MPSC examinations: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग गठित करण्यात आला आहे. या प्रकरणांशी संबंधित व्यक्ती, परीक्षार्थी, विद्यार्थी तसेच संबंधित संस्थांनी आपली निवेदने प्रतिज्ञापत्रासह १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

MPSC

एमपीएससी परीक्षांतील कथित गैरप्रकारांची चौकशी; १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करा – तुकाराम मुंढे

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग गठित करण्यात आला आहे. या प्रकरणांशी संबंधित व्यक्ती, परीक्षार्थी, विद्यार्थी तसेच संबंधित संस्थांनी आपली निवेदने प्रतिज्ञापत्रासह १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा चौकशी आयोग गठित करण्यात आला आहे. या आयोगामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एकूण नऊ परीक्षांशी संबंधित कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यात येणार आहे.

यामध्ये औषध निरीक्षक परीक्षा गट-ब, २०२५; महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५; महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा, २०२५; महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५; महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, २०२५; महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४; अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा, २०२३; महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५ आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५ या परीक्षांचा समावेश आहे.

निवेदनासोबत कागदपत्रे जोडणे आवश्यक

या प्रकरणासंदर्भात ज्यांच्याकडे माहिती, पुरावे किंवा संबंधित बाबींचे तपशील आहेत, अशा परीक्षार्थी, विद्यार्थी व अन्य व्यक्तींनी आपली निवेदने मराठी किंवा इंग्रजी भाषेत सादर करावीत. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत तसेच संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. ही निवेदने प्रतिज्ञापत्राद्वारे चौकशी आयोगाच्या कार्यालयात सादर करावीत.

निवेदन सादर करण्यासाठीचा पत्ता : अन्न व औषध प्रशासन भवन, दालन क्रमांक २०१, दुसरा मजला, बीकेसी, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१. तसेच निवेदनाची एक प्रत complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावरही पाठविता येणार आहे.

निवेदने व कागदपत्रे गोपनीय ठेवणार

चौकशी आयोगाकडे प्राप्त होणारी निवेदने, प्रतिज्ञापत्रे आणि त्यासोबत सादर करण्यात आलेली संबंधित कागदपत्रे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत. प्राप्त निवेदनांची छाननी केल्यानंतर संबंधित व्यक्तींना आयोगासमोर साक्षीदार म्हणून बोलावण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाकडे राहणार आहे.

एमपीएससीच्या नऊ महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांशी संबंधित कथित गैरप्रकारांची चौकशी होणार असल्याने या परीक्षांबाबत माहिती किंवा पुरावे असलेल्या व्यक्तींनी निर्धारित मुदतीत आपली निवेदने सादर करावीत, असे आवाहन सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top