Mahabreaking

[breaking_news]

Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता

Neminath Maharaj Saptah :श्री नेमिनाथ महाराज संस्थान  ब्राह्मण चिकना येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 5 एप्रिल पासून ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांकडून करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता 12 एप्रिल रोजी श्री स्वामी हरि चैतन्य सरस्वतीजी महाराज यांनी काल्याचे किर्तन व महाप्रसाद वितरणाने करण्यात आली.

Neminath Maharaj Saptah

बीबी :  श्री नेमिनाथ महाराज संस्थान  ब्राह्मण चिकना येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 5 एप्रिल पासून ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांकडून करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता 12 एप्रिल रोजी श्री स्वामी हरि चैतन्य सरस्वतीजी महाराज यांनी काल्याचे किर्तन व महाप्रसाद वितरणाने करण्यात आली.

ब्राह्मण चिकना येथे सुरू असलेल्या नेमिनाथ महाराज संस्थानवर वीस वर्षापासून दरवर्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सप्ताहानिमित्ताने दररोज नेमिनाथ महाराज मंदिर परिसराला सात दिवस यात्रेचे स्वरूप आले होते .दररोज भजन, राम कथा ,कीर्तन, धार्मिक ,सांस्कृतिक ,सामाजिक असे विविध दैनंदिन कार्यक्रम सुरू होते. तसेच रात्री नऊ ते 11 नामवंत महाराजांचे  हरी कीर्तनाचा लाभ परिसरातील भाविक  भक्तांना मिळत होता. या सप्ताहाला परिसरातील नेमिनाथ महाराजाचे भावीक भक्तगण भरभरून अन्नदान करत होते.  या सप्ताहाला परिसरातील मान्यवर ,प्रतिष्ठित मंडळी, महिला ,पुरुष, तरुण-तरुणी, वयोवृद्धांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाचा आनंद घेऊन महाप्रसादाचा आनंद घेत होते.   यावेळी गावातील ग्रामस्थ व परिसरातील भक्तगणमंडळी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने सप्ताह सोहळा आनंदाने साजरा करण्यात आला. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top