Mahabreaking

[breaking_news]

Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा

Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी महावितरणच्या वतीने महावितरण उपविभाग कार्यालय, श्याम कॉलनी, देऊळगाव राजा येथे १६ एप्रिल २०२६ रोजी  सकाळी १०.३० वाजता विशेष तक्रार निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Complaints of solar agricultural pump

 महावितरणचा पुढाकार;  देऊळगाव राजा येथे गुरूवारी विशेष तक्रार निवारण शिबीर

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी महावितरणच्या वतीने महावितरण उपविभाग कार्यालय, श्याम कॉलनी, देऊळगाव राजा येथे १६ एप्रिल २०२६ रोजी  सकाळी १०.३० वाजता विशेष तक्रार निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन असे आवाहन संदीप शेटे,उपविभागीय अभियंता महावितरण देऊळगावराजा यांनी केले आहे.

अधिक्षक अभियंता सुरेंद्र कटके आणि कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, वीज ग्राहकांना अखंड व दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने महावितरणने हा पुढाकार घेतला आहे. या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तक्रारींची नोंद करून शक्य असल्यास त्या जागीच सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. सौर पंप बसविणाऱ्या एजन्सींचे प्रतिनिधीही महावितरणच्या अभियंत्यांसोबत उपस्थित राहणार असल्याने तांत्रिक अडचणी, दुरुस्ती, बसवणीतील विलंब, बिघाड किंवा इतर समस्या त्वरित सोडवणे अधिक सुलभ होणार आहे. तालुक्यातील कृषी पंपधारकांनी आपल्या तक्रारी असल्यास या शिबीरात करण्याचे आवाहन संदीप शेटे,उपविभागीय अभियंता महावितरण देऊळगावराजा यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top