Mahabreaking

[breaking_news]

  voter list :मतदार यादीत नाव नाही? ३० सप्टेंबरपूर्वी करा अर्ज; खोटी घोषणा केल्यास एक वर्षापर्यंत कारावासाची तरतूद

voter list :विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-2026) अंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रारूप मतदार याद्यांच्या अनुषंगाने दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

voter list

SIR-2026 : मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यापासून दुरुस्तीपर्यंतची संधी; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत

बुलढाणा : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-2026) अंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रारूप मतदार याद्यांच्या अनुषंगाने दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

नवमतदार तसेच पात्र असूनही मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना त्यांच्या सध्याच्या रहिवासाच्या ठिकाणाहून नमुना-६ व घोषणापत्राद्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

मतदार यादीतील एखादे नाव वगळण्यासाठी नमुना-७, तर मतदार यादीतील नावातील दुरुस्ती, मतदार ओळखपत्रात बदल किंवा दिव्यांग चिन्हांकनासाठी नमुना-८ द्वारे अर्ज करता येणार आहे. तसेच मतदारसंघाच्या अंतर्गत किंवा मतदारसंघाबाहेर स्थलांतर झाल्यामुळे पत्त्यात बदल करण्यासाठीही नमुना-८ द्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

दावे-हरकतींवर सात दिवसांनंतर निर्णय

दावे व हरकती दाखल झाल्यानंतर संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून त्याबाबतची सूचना सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येते. त्यानंतर सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकरणांवर निर्णय घेण्यात येतो.

SIR-2026 अंतर्गत नमुना-६, ७ व ८ नुसार दाखल करण्यात आलेल्या दावे-हरकतींच्या अर्जांच्या याद्या मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर “Claims and Objections during SIR-2026” या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

खोटी घोषणा केल्यास कारवाई

दरम्यान, मतदार यादीच्या पुनरिक्षणासंदर्भात चुकीचे विधान अथवा खोटी घोषणा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

त्यामुळे पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील योग्य आहेत की नाही, याची खात्री करावी तसेच आवश्यक असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी दावे अथवा हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top