Mahabreaking

[breaking_news]

Sushama Raut : प्रांतिक तैलिक महासभेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सुषमा राऊत; युवा आघाडीची धुरा तानाजी पैठणे यांच्याकडे

Sushama Raut : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महिला आघाडी व युवा आघाडीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे यांनी कार्यकारिणीचा विस्तार जाहीर केला. महिला जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सुषमा राऊत यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली असून, युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी तानाजी रामदास पैठणे यांची निवड करण्यात आली आहे.

Sushama Raut

सुषमा राऊत यांची चौथ्यांदा महिला जिल्हाध्यक्षपदी निवड;  उपाध्यक्षपदी अश्विनीताई क्षिरसागर

साखरखेर्डा: महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महिला आघाडी व युवा आघाडीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे यांनी कार्यकारिणीचा विस्तार जाहीर केला. महिला जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सुषमा राऊत यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली असून, युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी तानाजी रामदास पैठणे यांची निवड करण्यात आली आहे.

संघटनेचा विस्तार करून महिला व युवकांना संघटित करण्याच्या उद्देशाने नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. महिला जिल्हाध्यक्ष म्हणून सुषमा राऊत यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महिला जिल्हा उपाध्यक्षपदी अश्विनीताई क्षिरसागर यांची निवड करण्यात आली.

सुषमा राऊत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिला जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत संघटनेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या पुढाकारातून शेगाव येथे राज्यस्तरीय वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक विवाहगाठी जुळल्या. तसेच त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची भूमिका समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. तेली समाजाला एका छताखाली आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

उच्चशिक्षित असलेल्या सुषमा राऊत यांनी नुकतेच वकिली व्यवसायातही पदार्पण केले आहे. प्रबोधनाची हातोटी आणि प्रभावी संवादशैली यामुळे त्यांनी समाजात आपला वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे. त्या दैनिक देशोन्नतीच्या देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून निर्भीडपणे पत्रकारिता करीत आहेत. महिला जिल्हाध्यक्षपदी चौथ्यांदा निवड झाल्याने संघटनेच्या महिला आघाडीला अधिक बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

महिला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अश्विनीताई क्षिरसागर यांचे वक्तृत्व प्रगल्भ असून, महिलांना संघटित करण्यासाठी त्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील धडाडीचे कार्यकर्ते तानाजी रामदास पैठणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना संघटित करून तैलिक महासभेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

या निवडीबद्दल समाजबांधवांकडून सुषमा राऊत, अश्विनीताई क्षिरसागर आणि तानाजी रामदास पैठणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top