Mahabreaking

[breaking_news]

Mahaparinirvana Day :मॉडेल डिग्री कॉलेज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 Mahaparinirvana Day :स्थानिक मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये ६ डिसेंबर रोजी भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. 

abhiwadan

बुलढाणा : स्थानिक मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये ६ डिसेंबर रोजी भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात कॉलेजचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसने यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून झाली. त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांच्या दूरदर्शी कार्याचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा आढावा उपस्थितांसमोर ठेवला.

कार्यक्रमात प्रा. डॉ. शीला दाभाडे रोकडे यांनी “महामानव कार्य – एक प्रेरणास्तोत्र” ही प्रभावी कविता सादर केली.
“६ डिसेंबर, दिन हा गंभीर, झाले महापरिनिर्वाण,
स्तब्ध झाले आंबेडकरी वीर,
भीमरायाचे कार्य मात्र आहे अजरामर,
घडविले त्यांनी या राष्ट्राला,
दिला संविधानाचा आधार.”
या ओळींनी सभागृहातील वातावरण अधिक भावनिक आणि प्रेरणादायी बनले.

यावेळी प्रा. डॉ. किसन वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी आजच्या पिढीस दिलेल्या दिशादर्शनाची आठवण करून दिली. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापकवृंद, इतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गोडबोले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. महेश व्यवहारे यांनी मानले.कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top