Mahabreaking

[breaking_news]

Shri Ganesh Arts College : श्री गणेश कला महाविद्यालयात महामानवाला अभिवादन

Shri Ganesh Arts College : कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आला.

Shri Ganesh Arts College

संजय तायडे

बोरगाव मंजू :  कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. व्ही. मेहरे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. मेघराज गाडगे आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जयंत राऊत उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आली.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. जयंत राऊत यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकत त्यांना विनम्र अभिवादन केले.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. मेघराज गाडगे यांनी “डॉ. आंबेडकरांची राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना असून ती मानवकल्याणाची गुरुकिल्ली आहे,” असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. मेहरे यांनी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा. रश्मी दहापुते, प्रा. सतीश जमधाडे, प्रा. संतोष धंदरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. यू. जामनिक यांनी केले, तर आभार प्रदर्शन संगीत विभागाचे प्रा. डॉ. सुधाकर मनवर यांनी केले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  प्रदीप ढोमणे,  गजानन निंबाळकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top