Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Wife murdered :जळगाव जामोद तालुका हादरला; उटी बु येथे कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या

Wife murdered :पत्नी सतत टोमणे मारून अपमान करीत असल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील उटी बु येथे 8 डिसेंबर रोजी पहाटे घडली.या घटनेमुळे जळगाव जामोद तालुक्यात खळबळ उडाली आहे. लक्ष्मी पवन धुंदाळे (वय 24) असे मृतक महिले नाव आहे. तसेच पवन गजानन धुंदाळे (वय 28) असे आरोपी पतीचे नाव आहे.

Wife murdered

सतत अपमान करीत असल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीला झोपेतच संपवले

जळगाव जामोद : पत्नी सतत टोमणे मारून अपमान करीत असल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील उटी बु येथे 8 डिसेंबर रोजी पहाटे घडली.या घटनेमुळे जळगाव जामोद तालुक्यात खळबळ उडाली आहे. लक्ष्मी पवन धुंदाळे (वय 24) असे मृतक महिले नाव आहे. तसेच पवन गजानन धुंदाळे (वय 28) असे आरोपी पतीचे नाव आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील उटी बु येथील पवन धुंदाळे यांची पत्नी लक्ष्मी ही पतीला टोमणे मारत होती. तू काही कामाचा नाहीस, कुठे जाऊन मर असं बोलून अपमान करायची. 7 डिसेंबरच्या रात्रीही तिने शिविगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पवन धुंदाळे याने पत्नी लक्ष्मी ही झोपलेली असताना तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. पिडीत विवाहितेचे सासरे गजानन धुंदाळे आणि सासू पुष्पा यांनी रात्री एक वाजता पोलीस पाटील संदीप गटमणे यांना घटनेची माहिती दिली. पोलीस पाटील गटमणे यांनी घटनास्थळाला भेट दिली असता लक्ष्मी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती पवन गजानन धुंदाळे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सात महिन्यांची श्रेया झाली पोरकी
पती पत्नीच्या वाद टोकाला पोहचला. त्यातून पतीने पत्नीही हत्या केली. त्यामुळे, या दाम्पत्याची सात महिन्यांची मुलगी मात्र पोरकी झाली आहे. आईचा मृत्यू झाला तर वडील आता जेलमध्ये जाणार आहेत. त्यामुळे, सात महिन्यांची श्रेया आता आई आणि वडिलांच्या प्रेमाला मुकणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top