Mahabreaking

[breaking_news]

MLA Manoj Kayande : सिंदखेडराजाच्या रस्ते विकासासाठी दिल्लीत आमदार मनोज कायंदे यांचा जोरदार पाठपुरावा; गडकरींकडून सकारात्मक प्रतिसाद

MLA Manoj Kayande :सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. जालना–पुलगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासह मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्ते व पुलांच्या कामांना तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

mla

 जालना–पुलगाव महामार्ग चौपदरीकरणाचा मुद्दा दिल्लीत; आमदार कायंदे यांनी गडकरींसमोर मांडल्या मतदारसंघाच्या विकासाच्या मागण्या

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. जालना–पुलगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासह मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्ते व पुलांच्या कामांना तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

mla

बैठकीदरम्यान आमदार कायंदे यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते अरुंद व जीर्ण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी पुलांचा अभाव असल्याने वाहतुकीवर परिणाम होत असून, त्याचा फटका शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच रुग्णवाहिका सेवेलाही बसत असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ते व पूल ही विकासाची मूलभूत साधने असून, दर्जेदार रस्ते उभारल्यास शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ होईल, उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल, रोजगारनिर्मितीला गती येईल तसेच अपघातांचे प्रमाण कमी होऊन शिक्षण व आरोग्य सेवा अधिक वेगाने नागरिकांपर्यंत पोहोचू शकतील, असा मुद्दा आमदार कायंदे यांनी बैठकीत मांडला. यासोबतच मतदारसंघातील प्रलंबित रस्ते व पुलांच्या प्रस्तावांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याची विनंतीही त्यांनी केली.

आमदार कायंदे यांनी विशेषतः जालना–पुलगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न प्राधान्याने मांडत या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाडा यांतील दळणवळण अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडण्यात आलेल्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

या बैठकीनंतर मतदारसंघातील प्रलंबित रस्ते व पुलांच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, भविष्यात वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या भेटीमुळे मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडून सकारात्मक हालचाली होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top