Mahabreaking

[breaking_news]

strongly condemn: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा देऊळगाव राजात कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध

strongly condemn: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितपणे केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (५ ऑगस्ट) देऊळगाव राजा येथील बसस्थानक चौकात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला तसेच घोषणाबाजी केली.

strongly condemn

   ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले; देऊळगाव राजात राष्ट्रवादीचे आंदोलन

गजानन तिडके

देऊळगाव राजा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितपणे केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (५ ऑगस्ट) देऊळगाव राजा येथील बसस्थानक चौकात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला तसेच घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका शाखेच्या वतीने आयोजित या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविला. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष खांडेभराड, भानुदास कोल्हे, पालिका गटनेते प्रदीप वाघ, सभापती विष्णू झोरे, तालुकाध्यक्ष प्रा. सदाशिव मुंडे, शहराध्यक्ष सुनील शेजुळकर, ज्येष्ठ नेते प्रा. दिलीप सानप, रामकिशन कव्हळे, भगवानराव खरात, गजानन काकड, शुभांगी पाखरे, ज्ञानेश्वर टेकाळे, विष्णू बोन्द्रे, शेख नाझीम, नारायण मुंडे, शेख अतिक, सय्यद नईम, शुभम कायंदे, विशाल गवई, रमेश जावळे, अरविंद खांडेभराड, रुस्तम भुतेकर, शंकर कासार, राजेंद्र खांडेभराड, गणेश सरोदे, सतीश झिने, अक्षय कायंदे, विशाल मुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांविषयी अवमानकारक भाषा वापरणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त करत संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदविला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top