Mahabreaking

[breaking_news]

environmental conservation :चित्रांतून उमटला पर्यावरण संवर्धनाचा संदेश; अकोल्यात वृक्षसंवर्धन चित्रकला स्पर्धा उत्साहात

environmental conservation : विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे, पर्यावरण संरक्षणाची भावना दृढ करणे आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘वृक्षसंवर्धन चित्रकला स्पर्धा–२०२६’चे आयोजन करण्यात आले होते. अकोला गार्डन क्लबच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट, मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट, अकोला आणि अकोला जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

environmental conservation

   विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारले ‘हरित अकोला’; वृक्षसंवर्धन चित्रकला स्पर्धा संपन्न

अकोला : विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे, पर्यावरण संरक्षणाची भावना दृढ करणे आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘वृक्षसंवर्धन चित्रकला स्पर्धा–२०२६’चे आयोजन करण्यात आले होते. अकोला गार्डन क्लबच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट, मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट, अकोला आणि अकोला जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट, मेन हॉस्पिटलसमोर, अकोला येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत स्पर्धा घेण्यात आली. अकोला शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, हरित अकोला आणि निसर्ग संवर्धनाचे संदेश आपल्या चित्रांमधून प्रभावीपणे मांडले.

कार्यक्रमाची सुरुवात अकोला गार्डन क्लबचे अध्यक्ष संजय शर्मा, रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्टचे अध्यक्ष अजय सेंगर, हिंदी गुजराती शिक्षा मंडळाचे अध्यक्ष उमेश बगडिया, माजी अध्यक्ष बी. एम. अग्रवाल, अकोला जिल्हा कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप शेवलकार, सचिव श्याम गोटफोडे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व, मानवी जीवनातील वृक्षांचे स्थान आणि वृक्षसंवर्धनाची गरज यावर संवाद साधला. विद्यार्थ्यांनी केवळ चित्रांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतूनही पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शारदा बियाणी यांनी केले.

दोन गटांत विद्यार्थ्यांचा सहभाग

स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आयोजकांकडून स्पर्धेसाठी चित्रकलेचा कागद मोफत उपलब्ध करून देण्यात आला होता. स्पर्धा पूर्णतः नि:शुल्क असल्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेल्या चित्रांमध्ये ‘झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा’, ‘वृक्ष आहेत तर जीवन आहे’ आणि ‘हरित अकोला’ यांसारखे प्रभावी संदेश मांडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण होण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले.

वार्षिक पुष्प प्रदर्शनात होणार चित्रांचे प्रदर्शन

स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ अकोला गार्डन क्लबच्या वार्षिक पुष्प प्रदर्शनात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील निवडक चित्रांचे विशेष प्रदर्शनही यावेळी भरविण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अकोला जिल्हा कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप शेवलकार, सचिव चंद्रकांत वाघ, स्पर्धा प्रमुख संजय आगाशे यांच्यासह सुभाष धार्मिक, मुकेश गव्हाणकर, संजय गोपनारायण, आनंदा फुलारी, दिनेश पाटील, महेंद्र कोकणे, संजय तायडे, विठ्ठल इढोळे, गोपाल देशमुख, उमेश जोशी, सुनील बोचरे, राहुल राठोड, विवेक फोकमारे, दीपक भुसारी, संतोष सहारे, मनोज वाडेकर, रवींद्र काळबांडे, गणेश ठाकरे, रवींद्र पांडे, राजेश टाले, प्रतीक वाघ, अर्चना बोरोकार, मेघमाला काठोके, शीतल चिकटे, रूपाली कुलकर्णी, शिरीकर मॅडम, कल्याणी खुमकर, शुभम धामणकर, आनंद वाघमारे, देशमुख सर, सचिन पाईक यांच्यासह शहरातील अनेक कला शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा हा उपक्रम अकोला शहरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top