Massive Fire : शहरात रविवारी सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक झाली. त्यामुळे, लाखो रुपयांचे नुकसान झाले. माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आगग्रस्त भागाला भेट देवून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

माजी आमदार संजय रायमुलकर यांनी दिले मदत मिळवून देण्याचे आश्वासन
मेहकर : शहरात रविवारी सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक झाली. त्यामुळे, लाखो रुपयांचे नुकसान झाले. माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आगग्रस्त भागाला भेट देवून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आज सकाळी नऊ वाजे दरम्यान डोणगाव रोडवरील कृषी वैभव कृषी सेवा केंद्राला आग लागली. दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे पाहून नागरिकांनी तातडीने नगरपालिका प्रशासनाला याची कल्पना देऊन अग्निशामक गाड्या पाठविण्याची विनंती केली. अग्निशामक दलाच्या वाहनांनी तातडीने पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण चीज वस्तू जळून खाक झाल्या. जवळपास १५ लाख रुपयाची हानी झाली. अग्निशामक दलाने तातडीने पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जानेफळ मार्गावरील हॉटेल जगदंबा आणि तोरणा अमृततुल्य या दुकानांनाही आग लागल्याची घटना घडली. सदर दोन्ही आस्थापना जळून खाक झाल्या आणि शेजारी असलेले ठोकरे कलेक्शन हे कापडाचे दुकान आहे आगीच्या भक्षस्थानी पडले. या आगीत २० लाख रुपयांपेक्षा जास्त हानी झाली आहे. आगीच्या घटनांची माहिती मिळताच माजी आमदार संजय रायमुलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. आस्थापनांचे मालक दिलीप ठाकरे ,उमेश चनखोरे ,चेतन ठाकरे , वैभव नागरिक यांची भेट घेऊन नुकसानीची माहिती घेतली व त्यांच्याशी चर्चा करून दिलासा दिला. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी,तहसीलदार निलेश मडके यांच्याशीही त्यांनी चर्चा केली व नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. सदर आगीच्या घटनांमुळे मोठे नुकसान झाले असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रायमुलकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक रवीराज रहाटे , आहे नीरज रायमुलकर ,शिवसेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख धनंजय गायकवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

