Mahabreaking

[breaking_news]

Father Brutally Murders Married Daughter :धक्कादायक! प्रेमसंबंधाच्या संशयातून वडिलांनीच केली विवाहित मुलीची निर्घृण हत्या; भाऊही कटात सहभागी

Father Brutally Murders Married Daughter :जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा शिवारात आढळलेल्या शिरविरहित आणि अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून वडिलांनीच विवाहित मुलीची निर्घृण हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या हत्येच्या कटात भाऊही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.  बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने १२ दिवसांच्या समांतर तपासानंतर दोघांना अटक केली आहे.

Father Brutally Murders Married Daughter

राजूरा शिवारातील शिरविरहित मृतदेह प्रकरणाची उकल;  बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

गजानन तिडके 

 बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा शिवारात आढळलेल्या शिरविरहित आणि अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून वडिलांनीच विवाहित मुलीची निर्घृण हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या हत्येच्या कटात भाऊही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.  बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने १२ दिवसांच्या समांतर तपासानंतर दोघांना अटक केली आहे.

दि. २६ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये सुनगाव येथील फिर्यादी सौ. मिना मनिष तडवी यांनी तक्रार दाखल केली होती. राजूरा शिवारातील नदीकाठावर एका महिलेचा मुंडके नसलेला अर्धवट जळालेला मृतदेह तसेच काही अंतरावर मानवी कवटी आढळून आली होती. मृतदेहाजवळ गुलाबी रंगाच्या चप्पला, काळ्या मण्यांची पोत आणि स्कार्फ आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०३(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची जबाबदारी दिली होती.

पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करून बुलढाणा, अमरावती, अकोला, जळगाव (खानदेश) तसेच मध्यप्रदेशातील बुरहानपूर परिसरात तपास मोहीम राबविण्यात आली. सीमावर्ती भागातील पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता महिलांच्या नोंदी तपासण्यात आल्या. गोपनीय माहितीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू ठेवण्यात आला. दरम्यान, ९ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मध्यप्रदेशातील खकणार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका बेपत्ता महिलेच्या तक्रारीची माहिती मिळाली. बापूराम नथ्थु कलमेकर यांनी आपली मुलगी शिवानी बापूराम कलमेकर हिची बेपत्ता तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान पोलिसांनी बापूराम कलमेकर व त्याचा मुलगा अजय कलमेकर यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आले. मृत महिला ही शिवानी बापूराम कलमेकर उर्फ सौ. शिवानी प्रकाश भिलावेकर असल्याचे स्पष्ट झाले. तिचा विवाह १५ एप्रिल २०२६ रोजी धारणी तालुक्यातील खाऱ्या टेंभूर येथील प्रकाश भिलावेकर याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी ती माहेरी खडकी येथे आली होती. तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, शिवानीचे तिच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय वडील बापूराम कलमेकर यांना होता. लग्नानंतरही ती ऐकत नसल्याच्या रागातून २३ एप्रिलच्या रात्री बापूरामने बांबूने तिच्या डोक्यात मारून हत्या केली. त्यानंतर मृतदेह घरात ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी वडील व मुलगा अजय यांनी मोटारसायकलवर मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील राजूरा शिवारात आणून टाकला. ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच धड व मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले. रक्ताने माखलेले कपडे व हत्यारे जंगलात फेकून दिल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणात आरोपी बापूराम नथ्थु कलमेकर (वडील) व अजय बापूराम कलमेकर (भाऊ), दोघेही रा. खडकी, ता. खकणार, जि. बुरहानपूर (म.प्र.) यांना अटक करून पुढील कारवाईसाठी जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वातील सपोनि. यशोदा कणसे, पोउपनि, पंकज सपकाळे, पोहेकॉ. एजाज खान, गणेश पुरुषोत्तम पाटील, पोकॉ. अजीज परसुवाले, अमोल शेजोळ, मंगेश सनगाळे, अमोल वनारे, दिपक वायाळ, राकेश नायडू, चापोहेकॉ. समाधान टेकाळे, शिवानंद हेलगे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा, पोकॉ. कैलाश ठोंबरे तांत्रिक विष्लेषण विभाग, बुलढाणा यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top